लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्यानागपूर प्रकल्पांतर्गत व्यावसायिक रन काहीच दिवसात सुरू होणार आहे. मेट्रोमध्ये तंबाखू व खºर्याचे सेवन आणि विक्री करण्यास बंदी टाकण्यात आली आहे. या प्रतिबंधित खाद्यान्न पदार्थांची वाहतूक आणि सेवन करणाऱ्यांवर मेट्रोच्या सुरक्षा पथकातर्फे दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागपूरकरांसाठी मेट्रो रेल्वेचा व्यावसायिक प्रवास खापरी ते सीताबर्डी १३ कि़मी. आणि लोकमान्यनगर ते सुभाषनगरपर्यंत ६ कि़मी. असा एकूण १९ कि़मी. लवकरच सुरू होणार आहे. प्रवाशांना तिकिटावरील क्यूआर कोडद्वारे स्टेशनवर प्रवेश मिळणार आहे. या दरम्यान सुरक्षा आणि स्वच्छता पथकातर्फे प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येणार आहे. प्रवाशांकडे तंबाखू, गुटखा वा खर्रा आढळून आल्यास त्यांच्याकडून जागेवरच दंड आकारण्यात येणार आहे. प्रवासी दंड देण्यास असमर्थ असेल तर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे स्टेशन आणि कोचेस स्वच्छ ठेवावेत, असे आवाहन महामेट्रोने केले आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशात सर्वाधिक वेगाने पूर्ण होणारा आणि कार्यान्वित होणारा मेट्रो रेल्वेचा हा पहिला प्रकल्प आहे. किफायत शुल्क आणि सुरक्षेत प्रवास घडवून आणण्याची प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. अशा स्थितीत नागपूर प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेले जागतिक दर्जाचे स्टेशन आणि कोचेस स्वच्छ ठेवण्याची तेवढीच जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. महाराष्ट्र राज्यात गुटखा, तंबाखू आणि खऱ्र्याचे सेवन, विक्री आणि साठवणूक करण्यास बंदी आहे. त्यामुळे प्रतिबंधित खाद्यान्न वाहून न नेता प्रत्येक नागरिकाने स्टेशन आणि कोचेस स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला मदत करावी आणि माझी मेट्रो म्हणून फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.प्रतिबंधित पदार्थांचे सेवन व वाहतूक करणाऱ्यांवर दंडजागतिक दर्जाचे स्टेशन आणि मेट्रोमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखू, गुटखा आणि खऱ्र्याचे सेवन आणि वाहतूक करणाऱ्यांवर नियमानुसार दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरकरांनी या प्रतिबंधित खाद्यान्न मेट्रो रेल्वेत नेऊ नये. स्टेशन आणि कोचेस स्वच्छ ठेवण्यास नागरिकाने सहकार्य करावे.अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक (प्रशासन), महामेट्रो.
मेट्रोत तंबाखू व खर्रा नेण्यास बंदी :दंड व शिक्षेची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 10:55 PM
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत व्यावसायिक रन काहीच दिवसात सुरू होणार आहे. मेट्रोमध्ये तंबाखू व खºर्याचे सेवन आणि विक्री करण्यास बंदी टाकण्यात आली आहे. या प्रतिबंधित खाद्यान्न पदार्थांची वाहतूक आणि सेवन करणाऱ्यांवर मेट्रोच्या सुरक्षा पथकातर्फे दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठळक मुद्दे स्वच्छता ठेवण्याची प्रवाशांची जबाबदारी