शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

नागपूरच्या औद्योगिक क्षेत्र बुटीबोरीत ‘बीईएल’चा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:14 AM

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुमारे १४०० हेक्टरवर नव्याने तयार होत असलेल्या विस्तारित बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात लष्करी दलासाठी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तयार करणारी भारत सरकारची कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) २०० एकर जागेवर प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. जागेसंदर्भात २७ जुलैला मुख्यमंत्री आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती आहे.कंपनीचा ...

ठळक मुद्दे२०० एकर जागेवर उभारणारलष्करासाठी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मितीविदेशातही होणार उपकरणांची निर्यात

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुमारे १४०० हेक्टरवर नव्याने तयार होत असलेल्या विस्तारित बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात लष्करी दलासाठी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तयार करणारी भारत सरकारची कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) २०० एकर जागेवर प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. जागेसंदर्भात २७ जुलैला मुख्यमंत्री आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती आहे.कंपनीचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपुरात उभारणी होणार आहे. ‘बीईएल’चे देशात अनेक प्रकल्प आहेत. कंपनी लष्करी दलासाठी संरक्षणविषयक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करते. लष्करी दलाला कोस्टल आणि बॉर्डरवर लागणारी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, शस्त्र शोधून काढणारी यंत्रणा, आकाश मिसाईल सिस्टिम आदींसह अन्य उपकरणांच्या निर्मितीत कंपनीचा हातखंडा आहे. नागपूर प्रकल्पातही या उपकरणांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या उपकरणांचा उपयोग देशात होणार आहे. शिवाय विदेशातही निर्यात करण्यात येणार आहे.नागपूर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे ‘बीईएल’ने प्रकल्पासाठी नागपूरची निवड केली आहे.प्रकल्पासाठी २०० एकर जागेची गरज नसली तरीही सुरक्षेच्या कारणांमुळे कंपनीने एवढ्या जागेची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. कंपनीने जागेचा प्रस्ताव नागपुरातील पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडे सोपविला आहे.जागेबाबत मुंबईत होणाऱ्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर प्रकल्पाचा मार्ग खुला होणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील या क्षेत्रातील अभियंते आणि तंत्रज्ञांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

‘बीईएल’ सारखे मोठे प्रकल्प बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात आल्यास त्यावर अवलंबून असलेल्या लहान कंपन्यांना काम मिळेल, शिवाय रोजगार निर्मितीत वाढ होईल. या क्षेत्रात मोठ्या आॅटोमोबाईल इंडस्ट्रीज सुरू व्हाव्यात, अशी मागणी बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनची अनेक वर्षांपासूनची आहे. ‘बीईएल’ या मोठ्या कंपनीपाठोपाठ अन्य उद्योगही या क्षेत्रात येतील.नितीन लोणकर, अध्यक्ष,बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.

‘बीईएल’ने विस्तारित बुटीबोरी इंडस्ट्रीज क्षेत्रात २०० एकर जागेचा प्रस्ताव मान्सून सत्रात दिला आहे. त्यावर वरिष्ठ स्तरावर निर्णय होणार आहे. त्यानंतरच जागा कंपनीला देणार आहे. विस्तारित बुटीबोरीत पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे. सर्वच कामे झाली आहे. या कंपनीमुळे नवीन उद्योगांकडून या क्षेत्रात जागेची मागणी वाढणार आहे.- संगीतराव, क्षेत्रीय अधिकारी,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग