शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

राज्यातील २३ उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पदोन्नती

By सुमेध वाघमार | Published: June 06, 2024 9:17 PM

-११ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी : तर ३८ सहायक मोटार वाहन निरीक्षकांनाही बढती

नागपूर : लोकसभा निवडणूकीचे निकाल लागून दोन दिवस होत नाही तोच गुरुवारी राज्यभरातील आरटीओमधील तब्बल २३ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ११ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी व ३८ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश धडकले. शिवाय, तीन प्रादेशिक परिवहन अधिकाºयांचा बदल्याही करण्यात आल्या.  

परविहन विभागातील तब्बल ३५ महत्त्वाच्या पदांचा कार्यभार अतिरीक्त म्हणून वर्षाेनवर्षे सांभाळला जात होता. धक्कादायक म्हणजे, १७ आरटीओ कार्यालयाला प्रादेशिक परिवहन अधिकारी नव्हते. दरम्यानच्या काळात शासनाने ९ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) दर्जा दिला. मात्र, त्याचेही कामकाज अतिरीक्त म्हणून सांभाळले जात होते. एकूणच आरटीओचे कामकाज प्रभावित झाले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने वारंवार प्रकाश टाकला.

-भूयार यांची अकोला तर चव्हाण यांची कोल्हापूर आरटीओ पदोन्नती

पूर्व नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती देत त्याची पदस्थापना अकोला आरटीओ येथे करण्यात आली. तर मागील अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण अखेर यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांची पदस्थापना कोल्हापूर आरटीओ येथे करण्यात आली.

-शहर आरटीओला बिडकर तर ग्रामीणला काठोळेनंदुरबार आरटीओ येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असलेले किरण बिडकर यांना पदोन्नती देत त्यांच्याकडे नागपूर शहराची तर, जालना आरटीओ येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असलेले विजय काठोळे यांनाही पदोन्नती देत त्यांच्याकडे नागपूर ग्रामीण देण्यात आले. चंद्रपूर आरटीओ येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. परंतु नावाची घोषणा झाली नसल्याची माहिती आहे.

-गीते यांच्यासह तिघांच्या बदल्याअमरावती आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते हे मागील सहा वर्षांपासून या कार्यालयाचा कारभार पाहत होते. मागील एक वर्षांपासून त्यांच्याकडे नागपूर शहर व नागपूर ग्रामीण आरटीओचा अतिरीक्त कार्यभार होता. आता त्यांच्या बदली झाली. त्यांच्या जागेवर नांदेड आरटीओचे शैलेश कामत आले आहेत. या शिवाय, रवी गायकवाड यांची ठाणे कार्यालयात बदली झाली.

-उपप्रादेशिक व निरीक्षकांच्या तात्पुरत्या पदोन्नतीपरिवहन आयुक्तांनी सेवाज्येष्ठतानुसार ११ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाºयांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती दिली खरी परंतु ती तात्पुरती असल्याचेही स्पष्ट केले. यात नागपूर ग्रामीण आरटीआतील स्नेहा मेढे यांना पदोन्नाती देत त्याची पदस्थापना वर्धा आरटीओत करण्यात आली. तर, ३८ सहायक मोटार वाहन निरीक्षकांनाही तात्पुरत्या स्वरुपात मोटार वाहन निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस