शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

स्टॉल्स, वस्तू विक्री केंद्राला चालना; मध्य रेल्वेने १२२.३५ कोटींचा गल्ला

By नरेश डोंगरे | Published: April 12, 2024 7:09 PM

कमाईचे नवनवे स्रोत : उत्पन्नाची कोटीच्या कोटी उड्डाणे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगवेगळ्या विभागातून उत्पन्नाची कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या मध्य रेल्वेने आता कोणतीही सेवा न देता (नॉन फेअर रेव्हेन्यू) १२२ .३५ कोटींचा महसूल मिळवला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.

प्रवासी वाहतूक, माल वाहतूक, खान-पान सेवा (कॅटरिंग), पार्सल सेवा, तिकीट तपासणी, स्क्रॅप विक्री आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विभागातून मध्य रेल्वेने संपलेल्या आर्थिक वर्षात शेकडो कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. एकीकडे कोट्यवधींची ही कमाई करतानाच रेल्वे प्रशासनाने उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत निर्माण करण्याचे गेल्या काही महिन्यांत प्रयत्न चालविले आहेत. त्यानुसार, जाहिरातीसाठी स्पेस उपलब्ध करून देणे, विविध स्टॉल्स, काउंटर, वस्तू विक्री केंद्र, जनऔषधी केंद्र सुरू करण्यास प्रोत्साहन देऊन मध्य रेल्वेने १२२.३५ कोटींचा महसूल मिळवला आहे. प्रवासी भाडे आणि माल वाहतुकी व्यतिरिक्त मिळवलेला मध्य रेल्वेचा हा महसूल भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये सर्वाधिक आहे.

खर्चातही साडेसहा कोटींची कपातएकीकडे उत्पन्नाचे नवनवे स्रोत निर्माण करतानाच मध्य रेल्वेने आपल्या खर्चातही साडेसहा कोटींची कपात केली आहे. खानपान सेवा, गाड्यांचा रखरखाव, अंतर्गत देखभाल आदींचे कंत्राट देण्यात येत असल्याने मनुष्यबळाची, अर्थात कर्मचाऱ्यांच्या पगाराची मोठी रक्कम वाचत आहे. साैर ऊर्जेचा पर्याय निवडून ठिकठिकाणी पॅनल निर्माण करण्यात आल्याने विजेवर होणारा भरमसाठ खर्चही मध्य रेल्वेने वाचविला आहे. संपलेल्या आर्थिक वर्षांत भांडवली, तसेच मनुष्यबळ बचतीवर मुंबई विभागाचे ४ कोटी, भुसावळ विभाग ८०.२१ लाख, नागपूर विभाग ५४ लाख, सोलापूर विभाग ६२.५५ लाख आणि पुणे विभागाचे ५२.८८ लाख, असे साडेसहा कोटी रुपये वाचवले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे