शासनाचे परिपत्रक : रिक्त पदे भरण्याला मदत होणारनागपूर : शासकीय विभागाच्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी दरवर्षी १ सप्टेंबर ते ३१ आॅगस्ट दरम्यान रिक्त होणारी पदे विचारात घेऊ न निवड सूची तयार के ली जाते. त्यानुसार निरनिराळ्या विभागातील रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही केली जाते. पदोन्नतीची प्रक्रिया संबंधित कार्यालयांनी निर्धारित कालावधीत पूर्ण करावी. त्याअनुषंगाने शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे कार्यवाहीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरवर्षी कार्यवाही पूर्ण करण्याची अंतिम तारीख, मुद्दा व करावयाची कार्यवाही आदींचा यात समावेश आहे. त्यानुसार ३१ मार्चला संबधित वर्षाची १ जानेवारी रोजीची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे, ३० जून गोपनीय अहवालावर संस्करण करणे, ३१ जुलैपर्यंत क्षेत्रातील अधिकारी यांचा सेवा तपशील संकलित करणे, ३१ आॅगस्टपर्यंत रिक्त पदांची संख्या निश्चित करून कक्षाकडून आरक्षण निश्चित करणे. ३० सप्टेंबरपूर्वी विभागीय पदोन्नती समितीच्या बैठका आयोजित करणे, १५ आॅक्टोबरपर्यंत नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी प्राप्त करणे व नियुक्ती आदेश निर्गमित करणे. निवड सूचीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करणे. ३१ आॅक्टोबरपर्यंत सामान्य प्रशासन विभागाने नियमानुसार सहमती दर्शविणे, ३० नोव्हेंबरपर्यंत विभागीय संवर्ग वाटपाचे विकल्प मागविणे. विभागीय संवर्ग वाटपाचे व पदस्थापनेचे अधिकार विभागप्रमुखांना प्रत्यार्पित केले असल्यास निवड सूचीतील अधिकाऱ्यांची नावे त्यांच्या अधिपत्याखालील संबंधित विभागप्रमुखांना कळविणे, पदस्थापनेची कार्यवाही, मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्याकडील निवड सूचीच्या प्रस्तवास व निवड सूचीतील अधिकाऱ्यांच्या शासनाच्या मान्यतेनंतर आदेश निर्गमित करणे. अशा स्वरूपाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या वेळापत्रकामुळे दक्षता घेण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव संजय तवरेज यांनी दिले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कार्यवाहीचे वेळपत्रक जाहीर करावे. यासाठी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे नेते कृष्णा इंगळे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. (प्रतिनिधी)
पदोन्नतीची प्रक्रिया वेळापत्रकानुसार
By admin | Published: January 10, 2016 3:40 AM