लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : साेयाबीनच्या पिकावर खाेडमाशी तर कपाशीवर गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भाव हाेत आहे. या राेग व किडींमुळे शेतमालाच्या उत्पादनात घट येत असल्याने शेतकऱ्यांनी या राेग व किडींचे याेग्यवेळी याेग्य व्यवस्थापन करायला पाहिजे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे यांनी हिंगणा तालुक्यातील पीक पाहणी कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले.
चालू खरीप हंगामात सुरुवातीला साेयाबीनच्या पिकाची अवस्था चांगली हाेती. मध्यंतरी वातावरणातील बदलामुळे साेयाबीनवर खाेडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. काही भागात कपाशीवर डाेमकळ्या (गुलाबी बाेंडअळी)देखील आढळून येत आहेत. काही शेतकऱ्यांनी कृषी विभागातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात उपाययाेजना करीत या किडी व राेगावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याेग्य उपाययाेजना करण्यावर वेळीच भर द्यावा, असेही महेश परांजपे यांनी सांगितले.
डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डाॅ. सुधीर बाेरकर, डाॅ. नंदकिशाेर लव्हे, तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे, मंडळ कृषी अधिकारी रामू धनविजय, कृषी सहायक निरंजन गहुकर, सराळ यांनी गुमगाव (ता. हिंगणा) येथील रवींद्र मुने, सालई (दाभा) येथील सुरेश नरड यांच्या शेतातील साेयाबीन तसेच किन्ही (भारकस) येथील गजानन सलाम यांच्या शेतातील कपाशीच्या पिकांची नुकतीच पाहणी केली.
सततचा पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे राेग व किडींना अनुकूल वातावरण मिळत असल्याने त्यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यांच्यापासून पिकांना वाचविण्यासाठी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना काही उपाययाेजनाही सुचविल्या आहेत. या पाहणी कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली हाेती.