लोकमत प्रॉपर्टी एक्स्पो : नामांकित बिल्डर्स व डेव्हलपर्सच्या प्लॉट, फ्लॅट, डुप्लेक्स, बंगल्यांना मागणी, आज अखेरचा दिवसनागपूर : लोकमतचा तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्स्पो रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये सुरू असून, दुसऱ्या दिवशी ग्राहकांची गर्दी होती. ग्राहकांना नामांकित बिल्डर्स व डेव्हलपर्सचे किफायत दरातील प्लॉट, फ्लॅट, डुप्लेक्स, बंगलो एकाच छताखाली पाहण्याची संधी आहे. काही जणांनी फ्लॅट आणि प्लॉटची नोंदणी केली आहे. आयोजन सर्वोत्तम आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले असून, अशा प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन वर्षांतून दोनदा व्हावे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी लोकमतशी बोलताना दिली. अशा प्रॉपर्टी शोचे आयोजन क्वचितच बघायला मिळत असल्याची प्रतिक्रिया शीतल माटे यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्या पतीसोबत वर्धा रोड येथील फ्लॅटच्या खरेदीसाठी आल्या होत्या. काही बिल्डर्सच्या योजना उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. स्वमालकीचा एक फ्लॅट असून, गुंतवणुकीच्या दृष्टीने प्लॉट पाहण्यासाठी एक्स्पोमध्ये आल्याची प्रतिक्रिया सत्यप्रसाद दुबे यांनी दिली. प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये नामांकित डेव्हलपर्सने ले-आऊटची योजना आणली आहे. अनेकांनी साईटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय काही स्टॉलवर ग्राहकांनी बजेटमधील फ्लॅट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. एक्स्पोनंतर ते साईट व्हिजिट करणार असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये नामांकित बिल्डर्सचे स्टॉलप्रॉपर्टी एक्स्पोमध्ये पिरॅमिड सिटी, टेकआॅप इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., अथर्व इन्फ्रास्ट्रक्चर्स, द इम्पिरिएन, नानिक गु्रप, पायोनियर, आदित्य इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., ग्रीन स्पेस इन्फ्रा, संदीप ड्वेलर्स प्रा.लि. (एसडीपीएल), नक्षत्र बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स, एचडीएफसी बँक, ओम शिवम बिल्डकॉन प्रा.लि., एन.के. रिएलेटर्स, इन्फ्राव्हेंचर प्रा.लि., श्री साई असोसिएट्स, पुष्कर होम्स प्रा.लि., प्रसन्ना डेव्हलपर्स, नीलगगन डेव्हलपर्स, डील माय प्रॉपर्टी डॉट कॉम, सुदर्शन सौर शक्ती प्रा.लि., हरिहर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., सेंट्रल ट्रेड कॉर्पोरेशन (ओरेव्हा), आॅर्बिटल एम्पायर, जय वॉलपेपर, ‘युनिक सिटी’ एव्हीसी होम्स, कन्सेप्ट बिल्डर्स, कृष्णा बिल्डकॉन, ग्रीन लाईन आदी बिल्डर्स व डेव्हलपर्सचे स्टॉल आहेत. अतुल यमसनवार यांना सोन्याचे नाणेतीन दिवसीय लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये दररोज भाग्यशाली सोडत काढण्यात येणार आहे. विजेत्याला एक ग्रॅम सोन्याचे नाणे भेटस्वरूपात २८ मार्चला एक्स्पोच्या समारोपीय कार्यक्रमात देण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी काढण्यात आलेल्या सोडतीत अतुल यमसनवार हे भाग्यशाली सोडतीचे विजेते ठरले आहेत.
एकाच छताखाली बजेटमध्ये प्रॉपर्टीज
By admin | Published: March 28, 2017 1:55 AM