सर्व स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद : लोकमतच्या तीन दिवसीय आयोजनाचा यशस्वी समारोपनागपुर : तीन दिवसीय लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो ग्राहकांनी प्रत्येक स्टॉलवर शहरातील विविध भागातील प्रॉपर्टीची पाहणी केली. काहींनी खरेदी केली तर अनेकांनी खरेदीचा निश्चय केला. रविवारी यशस्वी समारोप झाला.एक्स्पोचे यशस्वी आयोजन सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहाच्या मैदानावर करण्यात आले. भव्य डोममध्ये रिअल इस्टेटशी जुळलेले नामांकित बिल्डर्स व डेव्हलपर्सचे एकूण २४ स्टॉल होते. ओरेव्हा ई-बाईकचा स्टॉल होता. एक्स्पोला भेट देणाऱ्यांसाठी खाद्यान्नांचे स्टॉल होते. तीन दिवसात हजारो ग्राहकांनी एक्स्पोला भेट दिली.मध्य भारतातील सर्वश्रेष्ठ प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये एकाच छताखाली शहर आणि शहराबाहेरील प्रॉपर्टीची संपूर्ण रेंज उपलब्ध होती. सर्व स्टॉलवर त्यांच्याकडे उपलब्ध प्रॉपर्टीची माहिती लोकांना देण्यात आली. अनेकांनी आवडीची प्रॉपर्टीची नोंदणी केल्याची माहिती आहे. खरेदीदरम्यान मॉड्युलर किचन व हॉलचे पीओपी मोफत आणि रोख सवलतीचा फायदा घेतला. एक्स्पोमध्ये लोकांना प्रॉपर्टीसंंदर्भात कायदेशीर माहिती, मेट्रो रिजनची सीमा, वर्तमान स्थिती, प्रॉपर्टी कायदे आदींची माहिती देण्यात आली. भविष्यात अधिकाधिक परतावा देणारे प्रॉपर्टीचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले. त्याचा फायदा घेण्यासाठी एक्स्पोमध्ये दररोज हजारो लोकांनी गर्दी केली. रविवारी दिवसभर लोकांची ये-जा सुरू होती. आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या संपत्तीचे पर्याय निवडण्याची संधी ग्राहकांना मिळाली. प्रत्येक वर्गातील लोकांना बजेटमध्ये आणि आवडत्या ठिकाणचे प्लॉट, फ्लॅट, फार्महाऊस, रो-हाऊस, दुकाने, बंगले, पेंटहाऊस आदी प्रॉपर्टी पाहायला मिळाली. एवढेच नव्हे तर एक्स्पोमध्ये आलेल्या लोकांसाठी भाग्यशाली सोडतीचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना सोन्याचे नाणे देण्यात आले. रविवारी अंतिम सोडत लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह यांच्या हस्ते काढण्यात आली. तर स्टॉलधारकांच्या हस्ते ओरेव्हा ई-बाईकची सोडत काढण्यात आली. याप्रसंगी लोकमतचे सहायक महाव्यवस्थापक (जाहिरात-उत्तर महाराष्ट्र) आसमान सेठ, वरिष्ठ जाहिरात व्यवस्थापक सोलोमन जोसेफ यांच्यासह सर्व स्टॉलधारक आणि लोकमतचे जाहिरात प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. मालती कश्यप यांनी जिंकले सोन्याचे नाणेएक्स्पोमध्ये दररोज काढण्यात येणाऱ्या भाग्यशाली सोडतीत विजेत्यांना भेटस्वरूपात सोन्याचे नाणे देण्यात आले. एक्स्पोमध्ये पहिल्या दिवशी भाग्यशाली सोडतीचे विजेते जुने सुभेदार ले-आऊट येथील रहिवासी तुषार मंजुळे आणि दुसऱ्या दिवशी प्लॉट नंबर - १, पांडे ले-आऊट येथील रहिवासी खुशाल देशकर विजेते ठरले. तिसऱ्या दिवशी लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. यात मालवियानगर, खामला रोड येथील रहिवासी मालती कश्यप विजेती ठरली.स्टॉलधारकांना स्मृतिचिन्ह भेटसमारोपीय समारंभात लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये सहभागी २४ बिल्डर्स आणि डेव्हलपर्सला स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. लोकमत चमूने हे स्मृतिचिन्ह प्रत्येक बिल्डर्स व डेव्हलपर्सच्या स्टॉलवर जाऊन संबंधित स्टॉलधारकांना प्रदान केले. अर्पित नागे यांनी जिंकली ओरेव्हा ई-बाईकएक्स्पोमध्ये ओरेव्हा ई-बाईकचा स्टॉल होता. एक्स्पोमध्ये भेट देणाऱ्या लोकांनी भरलेल्या कूपनची भाग्यशाली सोडत रविवारी लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह यांच्या हस्ते काढण्यात आली. या सोडतीत ४८, पांडुरंग गावंडे ले-आऊट, टेलिकॉमनगर, प्रतापनगर येथील रहिवासी अर्पित नागे ओरेव्हा ई-बाईकचे विजेते ठरले. याप्रसंगी एक्स्पोमध्ये सहभागी स्टॉलधारक प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रॉपर्टी एक्स्पो ‘हाऊसफुल्ल’
By admin | Published: February 15, 2016 3:18 AM