लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रेडाई नागपूर मेट्रोचा तीन दिवसीय आठवा प्रॉपर्टी एक्स्पो उत्तर अंबाझरी मार्ग, एनआयटी स्वीमिंग पूलसमोरील नैवेद्यम हॉलमध्ये शुक्रवारपासून सुरू झाला. दिवाळीनिमित्त नागरिकांना घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी एक्स्पोच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी होती.उद्घाटन आ. सुधाकर देशमुख आणि नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी एचडीएफसी बँकेचे नितीन झंवर, आयसीआयसीआय बँकेचे अविनाश प्रसाद, आदित्य बिर्ला होम फायनान्सचे रोशन नवले, एसबीआय होम लोन्सचे तिवारी, के्रडाई नागपूर मेट्राचे अध्यक्ष अनिल नायर, सचिव गौरव अगरवाला, एक्स्पोचे आयोजक विशाल अग्रवाल आणि पदाधिकारी उपस्थित होते.एक्स्पोमध्ये पहिल्याच दिवशी सुमारे चार हजार नागरिकांनी नागपूरच्या कानाकोपºयातील मंजूर प्रॉपर्टी आणि खरेदीवर असलेल्या आॅफर्सची माहिती जाणून घेतली. घराचे स्वप्न साकारण्यासाठी आणि गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असलेल्या एक्स्पोमध्ये ४० बिल्डर्सचे १०० पेक्षा जास्त प्रकल्प सादर करण्यात आले आहे. यामध्ये बांधकाम पूर्ण झालेले आणि बांधकाम सुरू असलेले प्रकल्प आहेत. ८ लाख ६७ हजारांपासून २ कोटी रुपये किमतीच्या प्रॉपर्टी प्रदर्शित केल्या आहेत. यात फ्लॅट, पेंट हाऊस, बंगले आदींचा समावेश आहे. नोंदणी करणाºयांना नामांकित वित्तीय संस्थांतर्फे जागेवरच फायनान्सची सोय आहे. याशिवाय त्यांना विविध आॅफरचा फायदा मिळणार आहे. १५ आॅक्टोबरपर्यंत चालणारा एक्स्पो सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहील. प्रवेश नि:शुल्क असून पार्किंगची विस्तृत व्यवस्था आहे.रेरामध्ये नोंदणीकृत आणि मनपा, नासुप्र व जिल्ह्याधिकाºयांची मान्यता असलेल्या प्रॉपर्टीची माहिती एकाच छताखाली उपलब्ध आहे. एक्स्पोमध्ये सहभागी बिल्डर्स के्रडाई नागपूर मेट्रोचे सदस्य असल्यामुळे प्रदर्शित सर्व प्रकल्पात नागरिकांना खात्रीने आणि विश्वासाने घरकुल खरेदी करता येईल.एक्स्पोमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत फ्लॅट खरेदी करणाºयाला आर्थिक सवलत मिळणार आहे. एक्स्पोमध्ये असे अनेक प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले आहेत. ग्राहकांना गुंतवणुकीचीही संधी आहे. गेल्यावर्षी सातव्या प्रॉपर्टी एक्स्पोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. (वा.प्र.)
के्रडाई नागपूर मेट्रोचा प्रॉपर्टी एक्स्पो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:50 AM
क्रेडाई नागपूर मेट्रोचा तीन दिवसीय आठवा प्रॉपर्टी एक्स्पो उत्तर अंबाझरी मार्ग, एनआयटी स्वीमिंग पूलसमोरील नैवेद्यम हॉलमध्ये शुक्रवारपासून सुरू झाला.
ठळक मुद्देनामांकित बिल्डर्सचे रेरा नोंदणीकृत १०० प्रकल्प : नोंदणीवर विशेष सवलत, ग्राहकांची गर्दी