शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

आता विक्रीपत्रावरून मालमत्ता हस्तांतरण

By admin | Published: September 16, 2016 3:25 AM

नगर भूमापन कार्यालयात मालमत्ता फेरफार नोंदीसाठी अर्जदारास अर्जासोबत घोषणापत्राची प्रत जोडावीच

भूमी अभिलेख विभागाचा निर्णय : नागरिकांना मोठा दिलासा मिळणार नागपूर : नगर भूमापन कार्यालयात मालमत्ता फेरफार नोंदीसाठी अर्जदारास अर्जासोबत घोषणापत्राची प्रत जोडावीच लागते. वास्तविक अपार्टमेंट विकसित करताना सुरुवातीच्या कालावधीत संबंधित मालमत्ताधारक अथवा विकासकाव्दारे घोषणापत्राच्या दस्तांची नोंदणी केली जाते. त्यामुळे ही प्रत त्यांच्याकडे उपलब्ध असते. बऱ्याचदा अपार्टमेंट अथवा मालमत्ताची एकापेक्षा जास्त हस्तांतरण होतात. त्यामुळे फेरफारसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराजवळ घोषणापत्राची प्रत नसते. ती सहजपणे उपलब्ध होत नसल्याने अर्जदाराला त्रास होतो. ही बाब विचारात घेता जिल्हा भूमी अभिलेख विभागाने विक्रीपत्रावरून मालमत्ता हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांचा त्रास वाचणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नगर भूमापन अधिकारी क्र.१ ते ३ नागपूर यांच्यामार्फत अपार्टमेंटच्या हस्तांतरणानुसार फेरफाराच्या नोंदी मिळकत पत्रिकेवर घेण्यात येतात. एखाद्या मिळकतीवर विकसित केलेल्या इमारतीमधील अपार्टमेंटच्या हस्तांतरणानुसार फेरफार नोंदी मिळकत पत्रिकेवर घेताना त्या अपार्टमेंटचे हस्तांतरण दस्तामधील वर्णन हे त्या मिळकतीबाबत विकसनाच्या सुुरुवातीस करून ठेवलेल्या घोषणापत्राच्या दस्तातील वर्णनाशी जुळते का याची पडताळणी केली जाते. ते जुळत असल्यास हस्तांतरणाच्या दस्तानुसार फेरफाराच्या नोंदी मिळकत पत्रिकेवर केल्या जातात. अशा प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी घोषणापत्राच्या दस्तांची आवश्यकता असते. त्यानुसार नगर भूमापन अधिकारी घोषणापत्राची प्रत सादर करण्यास सांगतात. परंतु ती सादर न केल्यास मालमत्ताचे हस्तांतरण होत नाही. यामुळे नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे यांनी दिली. यानिर्णयामुळे यापुढे एखाद्या मिळकतीवर नव्याने निर्माण होत असलेल्या इमारतीच्या घोषणापत्राची नोंद घेण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास नियमानुसार घोषणापत्राची पडताळणी करून घोषणापत्रानुसार सविस्तर फेरफार नोंद घेतली जाणार आहे. नियमानुसार कार्यवाही केल्यानंतर घोषणापत्र फेरफार मंजूर झाल्यास त्याची मिळकतीवर सविस्तर नोंद घेण्यात येणार आहे. एखाद्या जमिनीवर नव्याने निर्माण केलेल्या इमारतीमधील अपार्टमेंटच्या हस्तांतरणानुसार फेरफार नोंदी घेण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास, तसेच एखाद्या जमिनीवर यापूवीं घोषणापत्राच्या नोंदीशिवाय अपार्टमेंटच्या फेरफार नोंदी झाल्या आहेत. त्यानंतर उर्वरित अपार्टमेंटच्या हस्तांतरणानुसार फेरफार नोंदी घेण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास घोषणापत्राची आवश्यक पडताळणी करून एकाचवेळी त्या इमारतीमधील घोषणापत्राच्या दस्तानुसार स्वतंत्र फेरफार नोंद व अपार्टमेंट डीडनुसार हस्तांतरणाची फेरफार नोंद स्वतंत्रपणे केली जाणार आहे. अपार्टमेंट डीडनुसार घेतलेली हस्तांतरणाची फेरफार नोंद मिळकत पत्रिकेवर घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी) ...तर अधिकाऱ्यांवर कारवाई अपार्टमेंट डीडनुसार हस्तांतरणाची फेरफार नोंद घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारास यापुढे अर्जासोबत घोषणापत्राची प्रत मागितली जाणार नाही. मिळकत पत्रिकेवरील नोंदीवरून फेरफार करण्यात येईल. अपार्टमेंटच्या नोंदी घेताना घोषणापत्राच्या नोंदी घेण्यात येतील. तसेच मिळकत पत्रिकेवर नोंद असूनही अर्जदाराला घोषणापत्राची प्रत मागितल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.