शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

फेरीवाल्यांसाठी ५० जागा प्रस्तावित

By admin | Published: July 31, 2016 2:31 AM

राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी शहरातील महापालिका क्षेत्रातील ५० जागा फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित आहे.

समितीची बैठक : स्थळांची पाहणी करण्यासाठी समिती नागपूर : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी शहरातील महापालिका क्षेत्रातील ५० जागा फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित आहे. नागपूर शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली आहे. या जागांची पाहणी करून यावर १५ दिवसात शिक्कामोर्तब केले जाणार आहे. महापालिकेच्या बाजार विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार नागपूर शहरात ३१ हजार फेरीवाले आहेत. यातील केवळ ३०६९ फेरीवाल्यांनी महापालिकेकडे नोंदणी केली आहे. शुक्रवारी समितीच्या बैठकीत फेरीवाल्यांचा झोननिहाय आढावा घेण्यात आला. सुचविलेल्या ५० जागांचे सर्वेक्षण करण्यासाठी एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. समिती प्रस्तावित ५० जागांना भेटी देऊ न संबंधित रस्त्यांची रुंदी, क्षेत्राचे क्षेत्रफळ, वाणिज्य क्षमता, शहर विकास आराखड्यानुसार रस्ता, ठिकाण व कोणत्या झोनमधील क्षेत्र आहे. फेरीवाला क्षेत्रासाठी प्रस्तावित जागा मेट्रो ट्रेन (जमिनीच्या ४० फुट आत तसेच मैदान), नेताजी मार्केट (बर्डी), टेम्पल बाजार व अपना बाजार(बर्डी), बुटी दवाखाना (बर्डी), कॉटनमार्केट अनाज गोदाम, कडबीबाजार चुंगी नाका मारवाडी गल्ली, महात्मा फुले भवन, पटवर्धन मैदान(भगवती मंदिरापुढे), मॉरिस कॉलेज अंडर ग्राऊं ड, शुक्रवारी रामकूलर चौक, राजविलास टॉकीजसमोर, पाचपावली उड्डाणपूल, कमाल टॉकीजसमोर, शनिवार बाजार, चांभार नाला ते टेका नाका, गड्डीगोदाम गोल बाजार, मंगळवारी बाजारच्या बाजूला, खामला डी.पी.आराखड्यानुसार त्रिमूर्तीनगर मटन मार्केट, रविनगर चौक नाला, गिट्टीखदान महापालिका शाळेपुढे, जरीपटका पोलीस स्टेशनसमोर, वैशालीनगर घाटाच्या बाजूला, इतवारी नंगा पुतळा, जुना पुस्तक बाजार(बर्डी), मॉरिस कॉलेज वसतिगृहाजवळ, हनुमाननगर विमा दवाखान्याच्या बाजूला, मिनीमातानगर मैदान, कळमना बाजारासमोर, दहीबाजार उड्डाणपूल, झांशी राणी चौक मातृसेवा संघापुढे, फुटपाथवर दोन फूट जागेवर, प्रजापती चौक, कच्छविसा बगिच्याबाहेर, वेअर हाऊ स वर्धमाननगर, लकडगंज बगिच्याबाहेर, होलसेल मार्केट, तीननल चौक, महाल बुधवार बाजार, अशोका कुल्फी बडकस चौक, सीताबर्डी मेन रोड, महाराजबाग चौक, सक्करदरा बुधवार बाजार, एसटी बसस्थानक, बकरा मंडी मोमीनपुरा, मुस्लीम लायब्ररी, चिल्ड्रेन पार्क पार्किंग, रामनगर चौक, पंजाबराव कृषी विद्यापीठ व चभडीया जागा.