नागपूर: माळशिरस तालुक्यातील मातंग समाजातील धनाजी साठे राहणार माळवाडी(बोरगाव) यांच्या निधनानंतर गावातील जातीवाद्यांनी त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली आणि अंतिमसंस्कार गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत करू दिला नाही. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्र मातंग एकीकरण समिती व आद्यक्रांतिगुरू लहूजी साळवे स्मारक ट्रस्टने या घटनेचा संविधान चौकात आंदोलन करून निषेध केला. आंदोलनाचे नेतृत्व एकीकरण समितीचे अध्यक्ष बुधाजी सुरकार व ट्रस्टचे अध्यक्ष विनायक इंगोले यांनी केले. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याच्या नावे निवेदन देऊन करण्यात आली. आंदोलनात महादेव जाधव, अशोक भावे, राजेश खंडारे, चंद्रकांत वानखेडे, पद्माकर बावणे, संजय कठाळे, सागर जाधव, अशोक पाखमोडे, वामन वानखेडे, विनोद लोखंडे, प्रा. राहुल हिवराडे, शिवशंकर ताकतोडे, ऋषी अव्हाडकर, प्रकाश उकुंडे, प्रमोद खंडारे, प्रवीण खडसे, बंडू जाधव, नितीन तायवाडे, किरण वानखेडे, गोविंद बावने, अंबादास काळे आदी सहभागी झाले.
माळवाडीतील घटनेच्या निषेधार्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:13 AM