शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

जवानांवरील हल्ल्याचा निषेध करीत 'आप'ने केले पाकच्या बडग्याचे दहन

By जितेंद्र ढवळे | Published: September 15, 2023 4:21 PM

हा प्रकार म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी असल्याचे शहराध्यक्ष कांबळे यावेळी म्हणाले.

नागपूर - काश्मीरातील अनंतनाग जिल्ह्यात  दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराच्या चार जवानांना वीरमरण प्राप्त झाले. या घटनेचा निषेध व्यक्त करीत शुक्रवारी आम आदमी पार्टीच्या वतीने मारबत मिरवणुकीदरम्यान पाकिस्तानच्या बडग्याचे दहन करण्यात आले. 

आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर, शहराध्यक्ष अजिंक्य कांबळे, शहर महासचिव श्याम बोकडे यांच्या उपस्थित बडकस चौकात हे आंदोलन करण्यात आले. पाकिस्तानातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. तेथील लोक अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी वणवण भटकत आहेत. अशात आपल्या देशातील अराजकता सांभाळण्याऐवजी पाकिस्तान भारतविरोधी कारवाया करीत आहे. हा प्रकार म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी असल्याचे शहराध्यक्ष कांबळे यावेळी म्हणाले. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.