लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील सहा विमानतळांच्या खासगीकरणाविरुद्ध जॉईंट फोरम ऑफ युनियन अॅण्ड असोसिएशन ऑफ एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियातर्फे गुरुवारी दुपारी भोजन अवकाशादरम्यान आंदोलन करण्यात आले. सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध नारे-निदर्शने करण्यात आली. देशातील सर्व विमानतळांवर आंदोलन शृंखला राबविण्यात आली.आंदोलन विमानतळावर रडार कॉम्प्लेक्ससमोरील कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी एएईयूचे शाखा सचिव एन.सी. निनावे, आयएकेयूचे संयुक्त महासचिव डी.बी. सातपुते, एएआयएससीचे सहायक सचिव आणि विमानतळाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाप्रकारचे आंदोलन देशातील अहमदाबाद, जयपूर, त्रिवेंद्रम, लखनौ, मंगलोर आणि गुवाहाटी या सहा विमानतळांच्या खासगीकरणाविरुद्ध सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनेक वर्षांपासून असोसिएशनतर्फे करण्यात येत आहे.निनावे म्हणाले, खासगीकरणामुळे अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रोजगारावर संकट येण्याची भीती निर्माण झाली आहे. विमानतळाच्या विकासासाठी खासगीकरण हा उपाय नाही. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी विमानतळाचे संचालन करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे सरकारने खासगीकरण करू नये. आंदोलनात युनियनचे यावलकर, आष्टनकर, उमरेडकर, गवई, बरडे, संदेश पाटील, पीटर आदी उपस्थित होते.
नागपूर विमानतळाच्या खासगीकरणाविरुद्ध निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 9:06 PM
देशातील सहा विमानतळांच्या खासगीकरणाविरुद्ध जॉईंट फोरम ऑफ युनियन अॅण्ड असोसिएशन ऑफ एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियातर्फे गुरुवारी दुपारी भोजन अवकाशादरम्यान आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्दे खासगीकरणाने नोकऱ्या जाण्याची भीती