शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नागपुरात वीज बिल दरवाढीविरोधात जागोजागी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 9:52 PM

शहर भाजपने वीज बिल दरवाढीविरोधात शनिवारी बूथनिहाय आंदोलन केले. आंदोलनातून वीज बिल रद्द करण्याची मागणी करण्यात आली. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवून चार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देभाजपने केले बूथनिहाय आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहर भाजपने वीजबिल दरवाढीविरोधात शनिवारी बूथनिहाय आंदोलन केले. आंदोलनातूनवीजबिल रद्द करण्याची मागणी करण्यात आली. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवून चार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली.शहरातील २०३९ बूथस्तरावर झालेल्या या निदर्शनात वाढीव वीज बिल रद्द करावे, लॉकडाऊनच्या कालावधीत ३०० युनिटपर्यंत वीज बिल व अधिकार रद्द करावा, एका वर्षासाठी विद्युत शुल्क रद्द करण्याची मागणी केली. शहर अध्यक्ष प्रवीण दटके म्हणाले, सरकारने अजूनही वीज बिल रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही, जोपर्यंत जनतेला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार. पुढे यासाठी ऊर्जामंत्र्यांचा घेराव करण्यात येईल. भाजप प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रतापनगर व हुडकेश्वर चौक येथे झालेल्या आंदोलनात सहभागी झाले. दटके यांनी टिळक पुतळा, खासदार डॉ. विकास महात्मे छत्रपती चौक, आमदार कृष्णा खोपडे शहीद चौक, आमदार विकास कुंभारे गोळीबार चौक येथील आंदोलनात सहभागी झाले होते. त्याचप्रकारे खामला चौकात प्रदेश महामंत्री रामदास आंबटकर, लोकमत चौकात महापौर संदीप जोशी उपस्थित होते. त्याचबरोबर माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्या उपस्थितीत व्हेरायटी चौक, माजी खासदार अजय संचेती लक्ष्मीभवन चौक, आमदार गिरीश व्यास राणी दुर्गावती चौक, आमदार अनिल सोले शंकरनगर चौक, आमदार मोहन मते मेडिकल चौक, माजी आमदार डॉ. मिलिंद माने कमाल चौकातील आंदोलनात सहभागी झाले होते.येथे झाली निदर्शनेपार्टी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. अजनी चौक, शताब्दी चौक, त्रिमूर्तीनगर, अग्रेसन चौक, भारतमाता चौक, बडकस चौक, प्रतापनगर, लोकमत चौक, माटे चौक, शताब्दी चौक, नरेंद्रनगर चौक, अंबाझरी टी-पॉईंट, शहीद चौक, पारडी, टेलिफोन एक्सचेंज चौक, छापरूनगर, राणी दुर्गावती चौक, इंदोरा चौक, भीम चौक, कडबी चौक, व्हेरायटी चौक, लक्ष्मीभवन चौक, शंकरनगर चौक, एलएडी चौक, रामनगर, सदर, लॉ कॉलेज, मेडिकल, सक्करदरा, रेशीमबाग, मानेवाडा या चौकांमध्ये आंदोलन करण्यात आले. गिट्टीखदान चौकात वॉर्ड अध्यक्ष धनराज रमेश तेलंग यांच्या नेतृत्वात झालेल्या निदर्शनात मनपा सत्तापक्ष नेता संदीप जाधव व मंडळ अध्यक्ष विनोद कन्हेरे, नगरसेवक प्रमोद कन्हेरे सहभागी झाले होते.

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलनelectricityवीजbillबिल