लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घुमंतू आणि अर्ध घुमंतू समाजाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी राज्यसभेचे खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे.नवी दिल्लीत खासदार महात्मे यांनी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. यावेळी विमुक्त घुमंतू आयोग व विकास कल्याण बोर्डाचे अध्यक्ष दादा इधाते यांची प्रमुख उपस्थिती होती. घुमंतू समाजाच्या मागणीसाठी महात्मे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांची भेट घेतली. त्यांनी २०१९ मध्ये या समुदायासाठी सामाजिक न्याय व सबलीकरणानुसार विकास कल्याण बोर्डाची स्थापना केल्याबद्दल गहलोत यांचे आभार व्यक्त करून घुमंतू समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्थिरता देण्याची गरज असल्याचे सांगितले. समाजाचा विकास होणार नाही तोपर्यंत ते घुमंतूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाज एका ठिकाणी टिकून राहिल्यास त्यांच्या मुलांना शिक्षण व आरोग्याच्या सुविधा मिळू शकतील. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना एका ठिकाणी रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली.
घुमंतू समाजासाठी १० हजार कोटींची तरतुद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 11:04 PM
घुमंतू आणि अर्ध घुमंतू समाजाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी राज्यसभेचे खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे.
ठळक मुद्देविकास महात्मेंची मागणी : निर्मला सीतारामन यांची घेतली भेट