लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील महानिर्मितीच्या प्रत्येक वीजनिर्मिती केंद्राला १५ दिवसांचा कोळसा स्टॉक पुरविण्याचे निर्देश कोळसामंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी वेकोलि प्रशासनाला दिले. ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत संबंधित निर्देश देण्यात आले.नवी दिल्लीत कोळसा मंत्री पियुष गोयल व वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. तीत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, खा. कृपाल तुमाने, संचालक श्याम वर्धने उपस्थित होते. वेकोलिकडे कोळसा भरपूर प्रमाणात आहे. महानिर्मितीला पुरेल एवढा कोळसा निश्चितपणे पुरवठा करण्याची तयारी यावेळी वेकोलिने दर्शविली. कळमना लूपचे काम तातडीने करून महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देशही कोळसामंत्र्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले. गोधनी ते कोराडी सध्या एकच ट्रॅक असल्यामुळे कोळसा वाहतुकीत अडचण निर्माण झाली आहे. कॉड (डबल) लाईनचे काम राहिले आहे. गोधनीपर्यंत हे काम झाले असून त्यापलिकडेचे कामही युध्दस्तरावर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.एप्रिल ते जून या दरम्यान विजेची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासन, कोळसा कंपनी आणि महानिर्मिती यांनी संयुक्त बैठक घेऊन किती कोळशाची आवश्यकता हे ठरवून घ्यावे. येत्या १५ दिवसात २० लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त कोळसा महानिर्मितीला कोळसा कंपनी आणि रेल्वेने पुरवण्याचे निर्देशही पियुष गोयल यांनी दिले. याशिवाय ऊजार्मंत्री बावनकुळे यांनी गोयल यांच्यासोबत या बैठकीत सावनेर विकास आराखडा, वेकोलिचे आरक्षण, बंद होणार असलेल्या कोळसा खाणींवर चर्चा, भानेगाव बिना पुनवर्सन, नवीन कायदा येण्यापूर्वी संपादन केलेल्या संपादित जमिनींना जुना कायदा लावणे, शेतकºयांना भूसंपादनाचा मोबदला, उमरेडच्या ६६० मेगावॉटसाठ़ी वेकोलिची जमीन मिळण्याबाबत, मासेमारीसाठी पॉण्ड तयार करणे, साई मंदिर कामठी कॅन्टॉनमेंट पर्यटन विकास आराखडा आदी विषयांवर चर्चा केली. गोयल यांनी या सर्व विषयांवर सकारात्मक भूमिका व्यक्त केली.कामठी रेल्वे स्टेशनवर ‘अ’ वर्ग सुविधा द्याकामठी हे नागपूर रेल्वेस्टेशननजीक असलेले मोठे स्टेशन आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांची वाहतूक सुरु असते. या स्टेशनचा दर्जा ऊंचावून ‘अ’ वर्ग स्टेशनच्या सर्व सुविधा कामठी रेल्वे स्टेशनला मिळाव्या, अशी मागणी ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे बुधवारी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत केली. रेल्वेमंत्र्यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका व्यक्त केली. कामठी सध्या ‘डी‘ वर्ग स्टेशन आहे. त्यामुळे प्रवाशांना आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा येथे उपलब्ध नाहीत. परिणामी प्रवाशांचे हाल होतात. कामठीजवळ कोराडी जगदंबा मंदिर हे प्रख्यात आहे. ड्रॅगन पॅलेस टेंपल प्रसिध्द आहे. वेकोलिची कार्यालये आहे. याशिवाय गार्ड रेजिमेंटल सेंटर आहे. या ठिकाणी सतत गर्दी होत असल्यामुळे प्रवाशांची ये-जा मोठ्या संह्ययेने असते. त्यातुलनेत स्टेशनवर पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. नागपूर हावडा या महत्त्वाच्या मार्गावर कामठी स्टेशन असून दिवसभरात किमान १०० गाड्यांची वाहतूक येथून सुरु असते. कामठी स्टेशनवर दोन्ही फलाटांवर यांत्रिक पायºयांची व्यवस्था हवी. फलाटावर कोच पोझिशन सिस्टिम लावणे, अतिरिक्त फूटओव्हर बिह्यज, वाढीव फलाटावर शेड टाकण्यात यावे, अतिरिक्त प्रतीक्षालय, वायफाय सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, गोंडवाना एक्स्प्रेसचा थांबा, सुलभ शौचालय आदी सुविधांची मागणी या बैठकीत करण्यात आली. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या सर्व विषयांवर सकारात्मक भूमिका घेत लवकरच या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न रेल्वेतर्फे करण्याचे आश्वासन दिले.