जिल्ह्यात १९,५०० परवानाधारक ऑटोचालक असून, मदतीसाठी करावयाचे अर्ज केवळ तीन हजार ऑटोचालकांनीच भरले आहेत. शिवाय, परवाना विधीग्राह्य असो की नसो, फिटनेस रिनिव्हल असो की नसो, लायसन्स रिनिव्हल असो की नसो, कोणत्याही परवानाधारक ऑटो चालकाचा अर्ज रिजेक्ट करण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय, ज्यांचे अर्ज मंजूर झाले, त्यांच्या खात्यात ४५ दिवस झाले तरी मदतीची रक्कम प्राप्त झालेली नाही. ती रक्कम तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी विदर्भ ऑटोरिक्षा चालक महासंघाचे अध्यक्ष व नागपूर जिल्हा ऑटोचालक मालक महासंघाचे महासचिव चरणदास वानखेडे, मोहन बावणे, भरत लांडगे, मेहबूब अहमद, नियाज अली, इस्राईल खान, अजय उके, दासबोध आनंदम, खोरेंद्र सोनिक, संजय जिचकार, महेश शुक्ला, रफिक, शाहिन, डेनियल बोरकर, कैलाश श्रीपतवार उपस्थित होते.
.........