नागपूर : जि़ल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या अखत्यारित ४७० तलाव आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे मागील काही वर्षात तलावांचे नुकसान झाले. नादुरुस्त तलावांची दुरुस्ती, लघुपाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे व दुरुस्तीसाठी १८ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीची मागणी लघुसिंचन विभागाने केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला आहे.
२०२२ मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हयातील जवळपास ११० तलाव नादुरुस्त झाले होते.१३७ तलावांना अतिवृष्टीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता. १५ ऑगस्ट २०२२ लाउमरेड तालुक्यातील एक तलाव फुटला होता. तर, याच वर्षात १४ जुलैला कुही तालुक्यातील देवळी खुर्द येथील एक तलावही फुटला होता. २०२३ मध्ये १३५ तलावांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. यासाठी ७.६९ कोटींची मागणी केली होती. परंतु निधी अभावी तलावांची दुरुस्ती झाली नाही.
नाला खोलीकरण कराअतिवृष्टी व पुरामुळे नाल्यात मोठ्याप्रमाणात गाळ साचल्याने पावसाळ्याच्या दिवसात नाल्यांना पूर आल्यास पुराचे पाणी लगतच्या शेतात शिरते. यामुळे शेती व पिकाचे मोठे नुकसान होते. याचा विचार करता जिल्ह्यात नाले खोलीकरण मोहीम राबविण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. १९ कोटींच्या प्रस्तावात नाले खोलीकरणांच्या कामांचाही समावेश आहे.प्रस्तावात १८८ कामांचा समावेशलघुसिंचन विभागाच्या प्रस्तावात १८८ कामांचा समावेश आहे. यात लघुपाटबंधाऱ्यासाठी भूसंपादन, लघुपाटबंधारे योजना व दुरुस्तीचे ३५ कामे, कोल्हापुरी बंधारे बांधकाम व दुरुस्ती, नाला खोलीकरण अशा १३२ कामांचा समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीकडून प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील एकूण तलाव ४७०* लघु सिंचन-१३४* पाझर तलाव-६०* गाव तलाव-३९* मामा तलाव-२१४* साठवण तलाव-२४