- महागाई विरोधात एनएसयुआयचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल-डिझेलच्या दैनंदिन खरेदीसाठी सर्वसामान्यांना कर्ज देण्याची मागणी करत महाराष्ट्र प्रदेश व नागपूर जिल्हा एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी इंदोरा चौक येथे आंदोलन केले.
एकीकडे विद्यार्थी आपले शैक्षणिक शुल्क भरू शकत नाही आणि दुसरीकडे केंद्र सरकारकडून इंधनाच्या दरात सातत्याने वृद्धी केली जात आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. त्यामुळे, सरकारने नागरिकांना इंधन खरेदीसाठी कर्जाची सुविधा द्यावी, अशी मागणी करत एनएसयुआयच्या कार्यकत्यांनी हे आंदोलन केले. यावेळी नागपूर जिल्हा अध्यक्ष आशिष मंडपे, राष्ट्रीय प्रतिनिधी आमीर नुरी, वैष्णवी भारद्वाज, प्रदेश महासचिव प्रतीक कोल्हे, निखिल वानखेडे, फरमान अली, जिल्हा महासचिव अनिरूद्ध पांडे, चेतन मेश्राम, कुणाल चौधरी, प्रणय ठाकूर, शुभम वाघमारे, विद्यासागर त्रिपाठी, रौनक नंदगावे, रॉयल गेडाम, ओवेस जेनुमल, पवन नाईक, साकेत बर्डे, अरक्षण शेख उपस्थित होते.
...........