शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

माथेफिरू विक्की नगराळेला फासावर लटकवू : अ‍ॅड. प्रशांत सत्यनाथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 12:35 AM

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळणाऱ्या माथेफिरू विक्की ऊर्फ विकेश नगराळेला फासावर लटकवले हेच आपले अंतिम लक्ष्य राहील, अशी भूमिका अ‍ॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.

ठळक मुद्देविशेष सरकारी वकील म्हणून खटला लढणार

राकेश घानोडे/ लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळणाऱ्या माथेफिरू विक्की ऊर्फ विकेश नगराळेला फासावर लटकवले जावे, ही समाजाची मागणी असून ती पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने खटला लढवेन. नगराळेला फाशीची शिक्षा मिळवून देणे हेच आपले अंतिम लक्ष्य राहील, अशी भूमिका अ‍ॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.अ‍ॅड. सत्यनाथन नागपुरातील ख्यातनाम फौजदारी कायदेतज्ज्ञ असून या प्रकरणात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. वर्धा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी गुरुवारी अ‍ॅड. सत्यनाथन यांची याकरिता सहमती घेतली. अ‍ॅड. सत्यनाथन यांनी ही माहिती खरी असल्याचे सांगितले व आपले लक्ष्यही स्पष्ट केले. ही अत्यंत दुर्दैवी व अमानुष घटना आहे. या घटनेमुळे समाजमन हादरले. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला. देशात अशाच घटनांवरून तीव्र असंतोष उफाळला असताना आरोपीने हे क्रूर कृत्य केले. भविष्यात अशा घटनांना आळा बसणे आवश्यक आहे. त्याकरिता नगराळेला फाशीची शिक्षा व्हावी याकरिता पूर्ण प्रयत्न करणार आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यासाठी पीडित प्राध्यापिकेचे बयान, प्रत्यक्षदर्शींचे बयान व परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे ठरतील, असे अ‍ॅड. सत्यनाथन यांनी पुढे बोलताना सांगितले. अ‍ॅड. सत्यनाथन यांचा जन्म नागपुरातील असून त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण वर्धा येथे झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून १९८१ मध्ये एलएल. बी. पदवी उत्तीर्ण केली. तेव्हापासून ते वकिली करीत आहेत.दीर्घ अनुभव असलेले कायदेतज्ज्ञनगराळेला फाशीची शिक्षा होण्यासाठी फौजदारी कायदेतज्ज्ञ वकिलाची नियुक्ती करण्याची समाजाची मागणी होती. त्यानुसार सरकारने अ‍ॅड. सत्यनाथन यांचे नाव अंतिम केले आहे. त्यांना विशेष सरकारी वकील म्हणून फौजदारी खटले लढण्याचा दीर्घ अनुभव आहे. ते नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात १९९३ ते १९९६ व २००० ते २००८ या कलावधीत मुख्य जिल्हा सरकारी वकील होते. यापूर्वी त्यांनी माओवादी साईबाबा, संतोष आंबेकर, हरीश्चंद्र धावडे यासह अनेक कुख्यात गुन्हेगारांविरुद्ध यशस्वीपणे खटले लढले आहेत.

टॅग्स :Capital Punishmentमृत्यूदंडadvocateवकिल