शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

नकली आई-वडिलांना सोपविली मनोरुग्ण तरुणी

By admin | Published: January 11, 2016 2:44 AM

घरून बेपत्ता झालेली एक स्थानिक मनोरुग्ण तरुणी उत्तर प्रदेशातील उन्नाव पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेसंकटात सापडली आहे....

यूपी पोलिसांचे कृत्य : नातेवाईक फिरताहेत दारोदारीजगदीश जोशी नागपूरघरून बेपत्ता झालेली एक स्थानिक मनोरुग्ण तरुणी उत्तर प्रदेशातील उन्नाव पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेसंकटात सापडली आहे. दोन आठवड्यांपासून तरुणीचे आई-वडील मदतीसाठी दारोदार भटकत आहेत. निशा गौरीशंकर इटनकर (२०) रा. पाचपावली असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे. निशाचे वडील मजुरी करतात तर आई शिवणकाम करते. घरी आई-वडिलांसह मोठी बहीण आणि एक भाऊ आहे. निशा आणि तिच्या मोठ्या बहिणीची मानसिक अवस्था चांगली नाही. २० डिसेंबर रोजी दुपारी निशा घरून अचानक निघून गेली. काही वेळानंतर ती दिसून येत नसल्याचे आईच्या लक्षात आले. खूप शोध घेऊनही मुलीचा पत्ता लागला नसल्याने ते काळजीत पडले. निशा यापूर्वीसुद्धा दोन-तीनवेळा बेपत्ता झाली होती. जागरूक नागरिक तिला तिच्या आई-वडिलांकडे आणून देत होते. कुटुंबीयांनी तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंंदविली होती. ती नेहमीप्रमाणे सुखरूप परत येईल, असा घरच्यांना विश्वास होता. २१ डिसेंबरला रात्री निशा उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सापडली. उन्नाव येथील व्ही.के. राजपूत नावाच्या व्यक्तीला ती दिसली. निशाची अवस्था पाहून ती भटकून शहरात आल्याचे लक्षात आले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने एका मंदिरात निशाची राहण्याची व्यवस्था केली. २२ डिसेंबरला उन्नाव पोलिसांना महिती देण्यात आली. राजपूत यांनी निशाच्या आई-वडिलांना फोन केला आणि निशा उन्नाव येथे असल्याची माहिती दिली. ठाण्यात येऊन आपल्या मुलीला घेऊन जाण्यास सांगितले. २२ डिसेंबर रोजी राजपूत यांनी निशाला उन्नाव येथील कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले. आर्थिक अडचण असल्याने निशाच्या आई-वडिलांनी उन्नावला जाण्यासाठी पैशाची जमवाजमव करू लागले. यात एक दिवस निघून गेला. ते २५ डिसेंबरला सायंकाळी उन्नाव येथील कोतवाली ठाण्यात पोहोचले. तिथे शुक्ला नावाच्या महिला ठाणेदार होत्या. त्यांनी निशाला तिच्या आई-वडिलांकडे सोपविल्याची माहिती दिली. ठाणेदाराची गोष्ट ऐकून निशाच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी ठाणेदाराला तेच निशाचे खरे आई-वडील असल्याचे सांगितले. त्यासंबंधीचे पुरावेसुद्धा दिले. निशाला घेऊन जाणाऱ्यांचे नाव विचारले असता ठाणेदार कुठलेही उत्तर देऊ शकल्या नाही. निशाच्या वडिलांनी राजपूत यांच्याशी संपर्क साधला. राजपूत यांनी दबाव टाकल्यावर ठाणेदाराने चुकीने संबंधितांकडून आई-वडील असल्याचे दस्तऐवज न घेतल्याचे सांगितले. त्यांचे नाव व पत्ताही पोलिसांनी लिहून घेतला नव्हता. चूक झाल्याची कबुली देत निशाला शोधून काढण्याचे आश्वासन देत शांत राहण्यास सांगितले. उन्नाव येथे कुणीच मदत करणारा नसल्याने निशाचे आई-वडील नागपूरला परत आले. या घटनेला २० दिवस लोटले आहे. निशाचा कुठलाही पत्ता लागलेला नाही. गरीब आणि अशिक्षित निशाच्या आई-वडिलांची मदत करायलाही कुणी तयार नाही. त्यांनी नगरसेविका आभा पांडे यांची भेट घेऊन आपबिती सांगितली. पांडे यांनी उन्नाव पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी निशाचा शोध सुरू असल्याचे सांगितले. आभा पांडे यांच्याकडून आर्थिक मदत घेऊन निशाचे आई-वडील पुन्हा उन्नावला गेले. या प्रकरणात सर्वस्वी उन्नावच्या ठाणेदाराची चुकी आहे. वरिष्ठ अधिकारी ठाणेदाराला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मनोरुग्ण असल्याने निशासोबत काही अनुचित घटना होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)उपचारासाठी विकले घर इटनकर दाम्पत्यांची २१ वर्षांची मोठी मुलगीसुद्धा मनोरुग्ण आहे. तिला येथे एकटी सोडून जाणे धोक्याचे असल्याने ते तिलासुद्धा सोबत घेऊन गेले. मुलींच्या उपचारासाठी इटनकर दाम्पत्यांनी आपले वडिलोपार्जित घरसुद्धा विकले. स्वत: काबाडकष्ट करून ते मुलींचा सांभाळ करीत आहेत. त्यांना एक मुलगाही आहे. तोसुद्धा मजुरी करतो. तथ्यांची होणार चौकशी उन्नावचे पोलीस अधीक्षक पवन कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, त्यांना या प्रकरणाची माहिती नाही. ठाणेदाराकडून माहिती घेऊन तथ्याच्या आधारावर चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले.