काेंढाळी : काेराेना रुग्णांना उपचारापश्चात म्युकरमायकाेसिस या आजाराची लागण व्हायला सुरुवात झाली आहे. या आजारापासून स्वत:चा बचाव कसा करायचा, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्यादृष्टीने काेंढाळी व परिसरातील गावांमधील ग्रामपंचायत कार्यालयात सभांचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते.
काटाेल तालुक्यातील काेंढाळी, गणेशपूर, गरमसूर, मरकसूर व वाजबोडी येथील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये आयाेजित सभांना उपजिल्हाधिकारी शीतल देशमुख, तहसीलदार अजय चरडे, पंचायत समिती सदस्य संजय डांगाेरे, नायब तहसीलदार रामकृष्ण जंगले उपस्थित हाेते. या सभांमध्ये शीतल देशमुख यांना म्युकरमायकाेसिसची लागण कशी हाेते, या आजाराची लक्षणे, त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी, या आजाराची लागण झाल्यास करावयाचे उपचार व उपाययाेजना याबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी उपस्थितांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. सभेनंतर या गावांमध्ये जनजागृतीला सुरुवात करण्यात आली. या सभांना ग्रामपंचायत पदाधिकारी, आराेग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व स्थानिक नागरिक हजर हाेते.