शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

स्मृती मंदिर परिसरावर सार्वजनिक निधीतून खर्च वैध असल्याचे सिद्ध करता आले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 10:17 PM

रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील विकास कामांवर सार्वजनिक निधी खर्च करणे वैध असल्याचे राज्य सरकार व महानगरपालिका यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सिद्ध करता आले नाही. त्यामुळे त्यांना नामुष्की सहन करावी लागली.

ठळक मुद्देहायकोर्टातील प्रकरण : राज्य सरकार व मनपावर ओढवली नामुष्की

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील विकास कामांवर सार्वजनिक निधी खर्च करणे वैध असल्याचे राज्य सरकार व महानगरपालिका यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सिद्ध करता आले नाही. त्यामुळे त्यांना नामुष्की सहन करावी लागली.स्मृती मंदिर परिसरामध्ये संरक्षण भिंत व अंतर्गत रोडचे बांधकाम करण्यासाठी महानगरपालिकेने १ कोटी ३७ लाख रुपये मंजूर केले आहेत. त्याविरुद्ध नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. राज्य सरकार व महानगरपालिका यांना स्मृती मंदिर परिसरातील विकास कामांवर सार्वजनिक निधी खर्च करणे वैध असल्याचे सिद्ध करता आले नसल्यामुळे, न्यायालयाने बुधवारी ही याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. अंतिम सुनावणीसाठी दाखल होणाऱ्या याचिका दीर्घकाळापर्यंत प्रलंबित राहतात. त्यामुळे आता १ कोटी ३७ लाख रुपयांचे भविष्य या याचिकेवर अंतिम निर्णय झाल्यानंतरच ठरेल. सध्या यापैकी एकही रुपया स्मृती मंदिर परिसरावर खर्च करण्यात आलेला नाही.राज्य सरकारने स्मृती मंदिर परिसराला श्रद्धास्थानाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे स्मृती मंदिर परिसरातील संरक्षण भिंत व अंतर्गत रोडचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ३७ लाख रुपये मंजूर करण्यात आले, असे न्यायालयाला सांगून निर्णयाचे समर्थन करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर न्यायालयाने श्रद्धास्थानाचा अर्थ काय होतो व श्रद्धास्थानावर सार्वजनिक निधी खर्च केला जाऊ शकतो काय, अशी विचारणा सरकार व मनपाला केली होती. त्यांना याचे समाधानकारक उत्तर न्यायालयाला देता आले नाही. परिणामी, स्मृती मंदिर परिसरावर सार्वजनिक निधी खर्च करणे वैध असल्याचे सिद्ध होऊ शकले नाही.असे आहे याचिकाकर्त्याचे म्हणणेराष्ट्रीय स्वयंसेवक संघ नोंदणीकृत संस्था नाही. त्यामुळे स्मृती मंदिर परिसरावर करदात्यांचे पैसे खर्च करणे अवैध आहे.महानगरपालिका आर्थिक अडचणीत असून अनेक सार्वजनिक योजना रखडल्या आहेत. असे असताना अनोंदणीकृत संघाच्या परिसरात एवढा मोठा खर्च करणे चुकीचे होईल, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ