राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने : शिवसेनेने पुतळा जाळलानागपूर : जम्मू काश्मीरच्या उरी येथील सैन्यतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे नागपुरातही पाकिस्तानविरोधात जनक्षोभ उफाळून आला. राजकीय पक्षांनी मंगळवारी पाकिस्तानचा निषेध नोंदविला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. तर, शिवसेनेतर्फे म्हाळगीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे यांच्या नेतृत्वात संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. माजी शहर अध्यक्ष दिलीप पनकुले, जावेद हबीब, अलका कांबळे, रेखा कृपाले, नगरसेवक राजू नागुलवार, महेंद्र भांगे, आलोक पांडे, कादीर शेख, टिकाराम पेंदाम, दिनेश त्रिवेदी, गिरीश ग्वालबंसी, मोरेश्वर जाधव, चरणजितसिंग चौधरी, मुन्ना तिवारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधी घोषणा देत या हल्ल्याचा निषेध नोंदविला. पाकिस्तानला धडा शिकविण्याचे जे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते ते पूर्ण करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिवसेनेतर्फे जिल्हाध्यक्ष सतीश हरडे यांच्या नेतृत्त्वात निदर्शने करण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या विरोेधात घोषणा देण्यात आल्या. पाकिस्तानी खेळाडू, कलाकार यांना भारतात येण्यास बंदी घालावी व पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊन धडा शिकवावा, अशी मागणी करण्यात आली. या वेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा पुतळा जाळून रोष व्यक्त केला. शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. आंदोलनात सुरेखा खोब्रागडे, नगरसेविका मंगला गवरे, राजेश कनोजिया, शंकर बेलखोडे, शरद सरोदे, मुन्ना तिवारी, चिंटू महाराज, महेश महाडिक, सुखदेव ढोके, नितीन तिवारी, गुड्डू रहांगडाले, संजोग राठोड, महादेव कुहिटे, प्रवीण देशमुख, संदीप मालखेडे, अजय गायकवाड, पुरुषोत्तम बन, विक्रम राठोड, ऋषिकेष जैन, सुरेश कदम, विशाल मानवटकर, रामू सोनटक्के, प्रवीण अधारे, राजू वाघमारे आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)
पाकिस्तानविरोधात जनक्षोभ उफाळला
By admin | Published: September 21, 2016 3:16 AM