लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. दिलीपकुमार भुपेनचंद्र राणा (मित्र) लिखित ‘ओंजळ’ या कविता संग्रहाचे सेवानिवृत्त पोस्ट अधिकारी मनोहर तांगडे व नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागाचे सहायक अध्यापक डॉ. विजय तांगडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकातील कविता मनाला साद घालणाऱ्या असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
ओंजळ या कविता संग्रहामध्ये सर्व नाती, त्यामधील जिव्हाळा आणि त्याचबरोबर महाराष्ट्रासह देशाचा मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्या सर्वांकडून निवेदन दिले आहे, असे मत लेखक डॉ. दिलीपकुमार राणा यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांनी हे पुस्तक वडील स्व. भुपेनचंद्र राणा यांना अर्पण केले.