पल्स ऑक्सिमीटर एक अत्यंत सुलभ उपकरण आहे. हे उपकरण बोटांना लावून ऑक्सिजन पातळीचा अंदाज घेता येतो. ९५ ते १०० टक्के दरम्यानची रिडिंग सामान्य मानली जाते. ही रिडिंग ९० ते ९५ टक्के दरम्यान असेल तर या पातळीला माईल्ड हायपोक्सिया मानले जाते आणि रिडिंग ९० टक्केच्या खाली असेल तर या स्थितीला चिंताजनक हायपोक्सिया म्हटले जाते. यावेळी अतिरिक्त ऑक्सिजन थेरपीची गरज असते. कोरोना महामारीच्या या काळात पल्स ऑक्सिमिटर प्रत्येक कुटुंबासाठी एक अत्यावश्यक जीवनरक्षक उपकरण म्हणून पुढे आले आहे.
प्र. वयस्कांमध्ये ऑक्सिमीटर कोणत्या बोटाला लावले जाते?
आपले हात आणि बोटांमध्ये दुहेरी रक्त पुरवठा होत असतो. रेडियल आणि अलनार आर्टरीच्या माध्यमातून हा पुरवठा होत असतो. मधल्या बोटामध्ये दोन्ही तऱ्हेचे रक्त प्रवाह होतात. म्हणून ऑक्सिमीटर लावण्यासाठी उजव्या हाताचे मधले बोट आदर्श म्हटले जाते. ऑक्सिमीटर लावताना बोटांवर नेलपॉलिश लावले नसावे, रिडिंगच्या वेळी बोट स्थिर असावे व रुग्ण थरथरत नसावा, ही काळजी घेतली जावी. बोटाला थोडे घासून उष्णता प्रदान केली जाऊ शकते. उत्तम रिडिंगसाठी कोणत्याही प्रकारचा घाम असेल तर ते पुसणे योग्य ठरेल.
प्र. रिडिंगला प्रभावित करणारे कारक?
लो ब्लड प्रेशर रिडिंगच्या सिग्नलला कमजोर करू शकते. वेसोकंस्ट्रक्शनमुळे रक्तपुरवठा कमी असणे, ही स्थिती वेसोप्रेसर ड्रग्सच्या वापराने होऊ शकते. थरथरणे किंवा मांसपेशींच्या संकुचनानेही रिडिंग प्रभावित होऊ शकते. कार्बन मोनोऑक्साईड पाॅयजनिंगमध्ये कार्बोक्सिहिमोग्लोबिनसुद्धा चुकीचे किंवा जास्तीचे एसपीओटू रिडिंग देऊ शकते. मेेथेमोग्लोबिनेमियामध्ये कम एसपीओटू रिडिंग येऊ शकते.
प्र. लिपिड्स आणि बिलिरुबिनचा परिणाम?
ब्लड लिपिडचे जास्तीचे कंन्सट्रेशन, हायपरएलिमनेशन आणि कावीळसुद्धा चुकीचे रिडिंग देऊ शकते. पल्स ऑक्सिमीटरला दोन निश्चित वेव्हलेंग्थ मोजण्याच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आले आहे. रक्तात अन्य प्रकारच्या त्रुटी, लाईटसोबतच त्या दोन्ही वेव्हलेंग्थच्या ट्रान्समिशनला प्रभावित करू शकतात.
प्र. पल्स ऑक्सिमीटरच्या मर्यादा?
पल्स ऑक्सिमीटर आपल्याला ऑक्सिजनसोबतच हिमोग्लोबिनच्या स्तराची टक्केवारी सांगते. हे उपकरण रक्तात असलेल्या कार्बन डायऑक्साईडबाबत कोणतीही माहिती देत नाही. सीओपीडीची उपस्थिती आणि कोविड न्युमोनियानंतरच्या चरणातील स्तर कमी किंवा जास्त असू शकतो. परंतु रुग्ण कार्बन डायऑक्साईडची मात्रा जास्त झाल्याने सुस्त किंवा बेशुद्ध होतो. हे उपकरण रक्तातील पीएच सांगू शकत नाही.
प्र. पल्स ऑक्सिमीटरवर मिळणारी अन्य माहिती?
ऑक्सिजनच्या पातळीसोबतच ऑक्सिमीटर आपल्याला रुग्णाच्या पेरिफेरल पल्स रेटचे स्तर प्रति मिनिट दाखवते. हे स्तर बीपीएमच्या बरोबरीचे असते. अर्थात प्रति मिनिट हृदयगती. ६० ते १०० दरम्यानची हृदयगती सामान्य मानली जाते. आराम करताना या सीमेच्या वर किंवा खालील गती चिंतेचा विषय ठरतो. अशा स्थितीत तत्काळ डॉक्टरच्या सल्ल्याची गरज असते. याला पीआर किंवा बीपीएम म्हटले जाते. अर्थात प्रति मिनिट पल्स रेट किंवा बिट्स.
प्र. काही ऑक्सिमीटरवर दिसणारी पीआय व्हॅल्यू काय आहे?
याला परफ्युजन इंडेक्स म्हटले जाते. हे पल्सेटाईल ब्लड फ्लो आणि नॉन पल्सेटाईट स्टेटिक ब्लड फ्लोचे गुणोत्तर असते. पीआय मूल्य अत्यंत कमी ०.०२ टक्के पासून ते मजबूत २ टक्केपर्यंत पल्स रेट असतो. पीआय मूल्य जेवढे जास्त असेल परफ्युजन तेवढेच उत्तम असेल आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन रेटिंगही तेवढीच बिनचूक असेल. रुग्णाची शारीरिक स्थिती आणि मॉनिटरिंग साईट्सवर पीआय विसंबून असते.
प्र. पल्स ऑक्सिमीटरचे वास्तवित सिद्धांत काय आहे?
हा सिद्धांत ऑक्सिजनेटेड आणि डीऑक्सिजनेटेड रेड सेल्सच्या रेड व इन्फ्रारेड लाईट वेव्हलेंग्थच्या सोखून घेण्याच्या क्षमतेवर निर्भर आहे. ऑक्सिहिमोग्लोबिन आणि डीऑक्सिहिमोग्लोबिन यांना वेगवेगळ्या मात्रेने साेखून घेते. पल्स ऑक्सिमीटर रंगात झालेल्या सौम्य परिवर्तनानेही किती ऑक्सिजन मॉलेक्यूल हिमोग्लोबिनशी जुळले आहेत किंवा ऑक्सिजन सॅच्युरेशन कसे आहे, हे जाणून घेते. उत्तम आणि बिनचूक रिडिंगसाठी दमदार पल्स रेट असणे गरजेचे आहे.
प्र. पल्स ऑक्सिमिटरचा आविष्कार कोणी केला?
१९३५ मध्ये जर्मन फिजिशियन कार्ल मॅथ्यूने पहिल्यांदा टू वेव्हलेंग्थ ईअर ऑक्सिजन सॅच्युरेशन मीटरचा आविष्कार केला. त्यानंतर १९७२ मध्ये जपानी बायोइंजिनिअर्स ताकुओ आओयागी आणि मिशिगन किशी यांनी पहिला पल्स ऑक्सिमीटर विकसित केला. सद्य:स्थितीत तर स्मार्ट वॉचेससुद्धा ऑक्सिजन सॅच्युरेशनचे माप घेतात. परंतु, त्यांना अद्याप आरोग्य सेवा पुरविणाऱ्यांनी मान्यता दिलेली नाही.
.................