नागरिकांच्या तक्रारी : कुणी केली टाळाटाळ, तर कुठे संपले होते स्टॉकनागपूर : जप्त करण्यात आलेली तूर डाळ रविवारपासून शहरात १०० रुपये किलो प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती होताच रविवारी सकाळपासून प्रशासनाने ठरवून दिलेल्या दुकानांमध्ये नागरिकांनी गर्दी केली. परंतु रविवारी अनेक दुकाने बंद होती. तर काही ठिकाणी दुकानदारांनी ही डाळ विकण्यासाठी अनेक बहाणे सांगितल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.शासनाने तूर डाळाची किमत नियंत्रणात ठेवण्यासाठी अवैधपणे साठवून असलेल्या गोदामांवर धाडी टाकून तूर डाळ जप्त केली होती. या कारवाईने अनेक टन डाळ जप्त करण्यात आली. ही डाळ योग्य किमतीमध्ये नागरिकांना विकण्यासाठी नागपुरातील २९ दुकानांमध्ये पाठविण्यात आले होते. रविवारपासून याची विक्री सुरू होणार होती. ही डाळ जरीपटका, सदर, सीताबर्डी, गड्डीगोदाम, मोहननगरसह अनेक परिसरातील दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. रविवारी ही डाळ विकत घेण्यासाठी नागरिक गेले असता त्यांना वेगवेगळी कारणे सांगण्यात आली. मोहननगर येथील दुकानामध्ये रविवारचा दिवस असल्याने दुकानदाराने डाळ विकण्यास नकार दिला. त्यांच्याकडे शासकीय डाळ १०० रुपये किलो प्रमाणे उपलब्ध असल्याची बाब दुकानदाराने मान्य केली.दुकानदाराने सांगितले की, शासकीय डाळ शासकीय वेळेत सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच उपलब्ध राहते. रविवारच्या सकाळीच स्टॉक संपले बर्डी येथील एका शॉपिंग मॉलमध्ये डाळ विकत घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना सांगण्यात आले की, या डाळीचा स्टॉक संपला आहे. ग्राहक सकाळीच दुकानात पोहोचले होते. रविवारपासूनच या डाळीची विक्री होणार होती. असे असतानाही सकाळीचच स्टॉक संपल्याचे सांगण्यात आल्याने ग्राहकालाही मोठे आश्चर्य वाटले. रविवार असल्याने काही दुकान बंद होते.
डाळीच्या विक्रीत खडे !
By admin | Published: May 16, 2016 2:58 AM