लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये नागपूर पाेलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लाॅकडाऊनची घाेषणा करण्यात आली असून, काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने कामठी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात मंगळवारी (दि. १६) उपाययाेजना व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून एकूण ४८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती ठाणेदारद्वय विजय मालचे व संजय मेंढे यांनी दिली.
काेराेना संक्रमण राेखण्यासाठी नागपूरसाेबतच कामठी शहरात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सेवा व दुकाने दुसऱ्या दिवशीही पूर्णपणे बंद हाेती. शिवाय पाेलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशान्वये कामठी(नवीन)चे ठाणेदार संजय मेंढे यांच्या नेतृत्वात कामठी शहरातील कळमना मार्ग, जयस्तंभ चौक, अजनी रेल्वे फाटकाजवळ तर कामठी(जुनी)चे ठाणेदार विजय मालचे यांच्या नेतृत्वात वारिसपुरा व कमसरी बाजार येथे नाकाबंदी करण्यात आली हाेती.
या सर्व ठिकाणी वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात आली. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४८ वाहनचालकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या माेहिमेत दुय्यम पोलीस निरीक्षक आर. एस. पाटील, सुचित गजभिये, शैलेश यादव, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रभाकर मत्ते, हेड कॉन्स्टेबल शहनाज अन्सारी, अश्विनी बोरकर, रूपेश मानवटकर, अविनाश नन्नवरे, प्रफुल्ल इंगोले, किशोर सोमकुवर आदी पाेलीस कर्मचारी सहभागी झाले आहेत.
...
नियमांचे पालन करा
काेरेाना संक्रमण राेखण्यासाठी प्रत्येकाने काेराेना प्रतिबंधक उपाययाेजना व नियमांचे पालन करावे, असे आवाहन ठाणेदारद्वय विजय मालचे व संजय मेंढे यांनी केले असून, ही माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या माेहिमेंतर्गत मास्क न वापरता फिरणारे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे, दुचाकी व चारचाकी वाहनात एकापेक्षा जास्त व्यक्तींनी प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.