लाेकमत न्यूज नेटवर्क
वानाडाेंगरी : हिंगणा तालुक्यातील काेराेना रुग्णांमध्ये वाढ हाेत असताना तहसील प्रशासनाने उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाने तालुक्यातील कान्हाेलीबारा येथे रविवारी (दि.२१) मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून पाच हजार ९०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.
हिंगणा तालुक्यात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुक्यातील प्रत्येक गावातही नियमांचे काटेकाेरपणे पालन व्हावे, या उद्देशाने रविवारी कान्हाेलीबारा येथे तहसीलदार संताेष खांडरे यांच्या मार्गदर्शनात एक भरारी पथक पाठविण्यात आले. या पथकाने कान्हाेलीबारा गावात फिरून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत ५,९०० रुपयाचा दंड वसूल केला. यावेळी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून काेराेनाशी लढण्यासाठी प्रशासनाला मदत करावी व स्वत:चे रक्षण करावे, याबाबत जनजागृती करण्यात आली. ही कारवाई तहसीलदार संताेष खांडरे यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी आर. एम. डांगाले, तलाठी आर. व्ही. तळाेकार, ए. पी. सव्वालाखे, सुधीर लंजे, पाेलीस कर्मचारी राजू भुकटे, काेतवाल विलास नरताम आदींच्या पथकाने केली.