लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : काेराेना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिकांनी उपाय याेजनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या उपाय याेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची माेहीम ही कामठी तहसील प्रशासनाने सुरू केली आहे. ही माेहीम जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार अरविंद हिंगे यांनी दिली.
दिवाळीनंतर काेराेना संक्रमण कमी व्हायला सुरुवात झाल्याने शासनाने नागरिकांना उपाय याेजनांचे पालन करण्याचे आवाहन करीत काही प्रमाणात सूट दिली हाेती. प्रशासनाने कानाडाेळा करताच नागरिकांनी मनसाेक्त फिरायला, गर्दी करायला तसेच धुमधडाक्यात लग्नसमारंभ करायला मागे बघितले नाही. त्यातच मागील आठवड्यापासून नागपूर शहरासह जिल्ह्यात काेराेना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा कंबर कसली आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये तहसीलदार अरविंद हिंगे यांनी नुकतीच कामठी तहसील कार्यालयाच्या सभागृहात विशेष सभा बाेलावली हाेती. या सभेला खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे, कामठी (जुनी)चे ठाणेदार विजय मालचे, कामठी (नवीन)चे ठाणेदार संजय मेंढे, विस्तार अधिकारी मनीष दिघाडे, रनाळ्याच्या सरपंच सुवर्ण साबळे, ग्रामविकास अधिकारी राजू फरकाडे, सपना गावंडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व प्रमुख कर्मचारी उपस्थित हाेते. या सभेत उपाय याेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देेश तहसीलदार अरविंद हिंगे यांनी दिले.
...
पाहणीसाठी पथकांची निर्मिती
ठाणेदारद्वय विजय मालचे व संजय मेंढे यांच्या नेतृत्वात पथकांची निर्मिती करण्यात आली असून, ही पथके कामठी शहरातील शुक्रवारी बाजार, रेल्वे स्थानक, बसस्थानक, रनाळा परिसरातील तसेच कामठी-नागपूर मार्गावरील मॉल, लॉन, मंगल कार्यालय, सभागृह यासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देऊन काेराेना प्रतिबंधक उपाय याेजनांची अंमलबजावणी केली जात आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. उपाय याेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही अरविंद हिंगे यांनी स्पष्ट केले.
...
दंडाचे स्वरूप
घराबाहेर पडताना नियमित मास्क न वापरणाऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड ठाेठावला व वसूल केला जाईल. लग्न समारंभात ५० नागरिकांपेक्षा अधिक व्यक्ती सहभागी झाल्याचे निदर्शनास येताच संबंधित लाॅन, मंगल कार्यालय व सभागृह मालकांवर सार्वजनिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८, २६९, २७० नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी सांगितले.