शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
2
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
3
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
4
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
5
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
6
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
7
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
8
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
9
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
10
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
11
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
12
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
13
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
14
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
15
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
16
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
17
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
18
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
19
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
20
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले

शिक्षक संवर्गाच्या वेतनास पूरणचंद्र मेश्राम अपात्र

By admin | Published: July 21, 2016 2:06 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांची संपूर्ण सेवा शिक्षकेतर संवर्गातील असल्यामुळे ...

हायकोर्टात शासनाचे प्रतिज्ञापत्र : याचिका फेटाळण्याची विनंती नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांची संपूर्ण सेवा शिक्षकेतर संवर्गातील असल्यामुळे त्यांना शिक्षक संवर्गाचे वेतन दिले जाऊ शकत नाही, असे उत्तर राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले आहे. शासनातर्फे उच्च शिक्षण विभागाच्या नागपूर विभागीय सह-संचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ३१ जानेवारी २०१५ रोजी कुलसचिवांचे पद भरण्यासाठी जाहिरात दिली होती. हे पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव होते. या जाहिरातीत शिक्षक संवर्गातील उमेदवारांकरिता ३७,४००-६७,००० रुपये वेतन श्रेणी व १०,००० रुपये ग्रेड पे तर, शिक्षकेतर संवर्गातील उमेदवारांकरिता ३७,४००-६७,००० रुपये वेतन श्रेणी व ८,९०० रुपये ग्रेड पे नमूद करण्यात आले होते. मेश्राम यांनी शिक्षकेतर संवर्गातून अर्ज सादर केला होता. त्यावेळी त्यांनी वेतनावर आक्षेप घेतला नव्हता. नियमानुसार त्यांना शिक्षक संवर्गाचे वेतन लागू केले जाऊ शकत नाही, अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. तसेच, मेश्राम यांची रिट याचिका खारीज करण्याची विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने शासनाच्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केल्यानंतर पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी एक आठवड्यानंतर सुनावणी निश्चित केली. वित्त व लेखाधिकारी पदाकरिता ३० मे २०१४ पासून तर, कुलसचिव पदाकरिता २५ मे २०१५ पासून ३७,४००-६७,००० रुपये वेतन श्रेणी व १०,००० रुपये ग्रेड पे आणि १२ आॅगस्ट २००९ रोजीच्या ‘जीआर’अनुसार लाभ देण्याची मेश्राम यांची मागणी आहे. तसेच, त्यांनी ३० मे २०१४ पासून वेतनातील फरक अदा करण्याची विनंतीही याचिकेत केली आहे. मेश्राम यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)