अंकिता देशकर/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उद्यापासून नागपूर येथे आयोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, मराठी कवी, लेखक व नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी ‘लोकमत’शी साधलेला संवाद. ‘कविता, कादंबऱ्या, नाटकं, नृत्य कोणती पण कला असो, त्या कलेसोबत व्यक्तिस्वातंत्र्य हे जोडलेलेच असते. व्यक्तिस्वातंत्र्य, म्हणजे नुसते शासनाविरु द्ध बोलणे असे नसून, सामान्य गोष्टीत सुद्धा ते आढळते. माझे स्वातंत्र्य अबाधित असले पाहिजे हे कुठल्याही व्यक्तीला वाटेल, त्यात चूक काहीच नाही. व्यक्तिस्वातंत्र्य छोट्याछोट्या गोष्टींमध्ये असते. माणसांनी विवेकाने वागणे हे सुद्धा स्वातंत्र्यच, असे मनोगत प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले.या वर्षीच्या नाट्य संमेलनात तुम्हाला काय वेगळे दिसतंय, याबद्दल गज्वी म्हणाले, या संमेलनात बरेचसे वेगळ्या धाटणीची नाटकं दिसत आहेत. त्यातील एक म्हणजे श्याम पेठकर लिखित आणि हरीश इथापे दिग्दर्शित 'तेरवं', ज्यात विधवा स्त्रियांचे प्रश्न मांडण्यात आले आहेत. नागपूरचे प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील असे विचारले असता, गज्वी म्हणाले, संमेलनाचे स्वरूप हे मनोरंजक आहे, यात तमाशा, परिसंवाद, नाटकं या सगळ्यांचा समावेश आहे. सगळ्यांना आपण एकाच वेळी खूश करू शकत नाही हे मात्र खरंय. या चार दिवसीय संमेलनानंतर आपण ‘अॅनालिसिस’ करू शकतो की या संमेलनाने आपल्याला काय दिले?‘पूर्वी गावाकडे आम्ही अनेक नाटकं करायचो, आज त्यांना झाडीपट्टी असे लोक म्हणतात. उमाजी नाईक, गड आला पण सिंह गेला या नाटकांना आता झाडीपट्टीचे नाटक म्हणता येणार नाही. आमच्यासारख्या कलावंतांनी खेड्यातून येऊन मुंबईत आपले स्थान निर्माण करणे हीच मोठी गोष्ट आहे. विदर्भाच्या रंगभूमीबद्दल आता जर विचार केलात तर असे लक्षात येते की नागपूरमध्ये रंगभूमी उभी नाही. कारण एकदा राज्य नाट्य स्पर्धा झाली की कुणी काहीच करत नाही. वर्षभर नाटकं सादर केली जात नाहीत. जागतिकीकरणामुळे सगळे बदलतेय. त्यामुळे असे म्हणणे बरोबर नाही की थिएटर नागपुरात राहिलेले नाही. पण त्याचे स्वरूप नक्कीच बदलले आहे.आज व्यावसायिक नाटकं करायची म्हटली तर किमान ८-१० लाखाचा खर्च येतो. त्यात पण काही नट असले तरच नाटकांना गर्दी होते. हवा तसा व्यवसाय नाटकं करीत नाहीत. प्रत्येक नाटक चालेलच याची शाश्वती नाही.नाट्य संमेलनाकडून कलावंतांना काय शिकायला मिळेल याविषयी गज्वी म्हणतात, ‘कला तुमच्यासमोर जेव्हा सादर होते तेव्हा त्यातील काय चांगले हे तुम्हीच ठरवायचे आणि ते घेऊन आचरणात आणायचे. ‘एकच प्याला ’ सादर झाला आणि सगळ्यांना कळले दारूमुळे संसाराची माती होते. पण तरी आज आपण जे दृश्य बघतो ते वेगळेच आहे. कलेमधून काय घ्यावे हे व्यक्ती निगडित आहे. असं म्हणतात की६४ कला आहेत. पण सगळ्याच चांगल्या आहेत, असे आपल्याला म्हणता येणार नाही.
चांगल्या गोष्टी निर्माण करणे हाच कलेचा हेतू : प्रेमानंद गज्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:56 AM
उद्यापासून नागपूर येथे आयोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, मराठी कवी, लेखक व नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी ‘लोकमत’शी साधलेला संवाद. ‘कविता, कादंबऱ्या, नाटकं, नृत्य कोणती पण कला असो, त्या कलेसोबत व्यक्तिस्वातंत्र्य हे जोडलेलेच असते. व्यक्तिस्वातंत्र्य, म्हणजे नुसते शासनाविरु द्ध बोलणे असे नसून, सामान्य गोष्टीत सुद्धा ते आढळते. माझे स्वातंत्र्य अबाधित असले पाहिजे हे कुठल्याही व्यक्तीला वाटेल, त्यात चूक काहीच नाही. व्यक्तिस्वातंत्र्य छोट्याछोट्या गोष्टींमध्ये असते. माणसांनी विवेकाने वागणे हे सुद्धा स्वातंत्र्यच, असे मनोगत प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्दे लोकमतशी साधला संवाद