नागपूर जिल्हा न्यायालयाला बहुमाननागपूर : नागपूर जिल्हा न्यायालयाच्या पहिल्या महिला प्रधान न्यायाधीश म्हणून पुष्पा गणेडीवाला यांची उच्च न्यायालयाने नियुक्ती केली. प्रधान जिल्हा न्यायाधीश किशोर सोनावणे यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाल्यानंतर सोनावणे यांचे पद रिक्त होते. त्यांच्या जागी गणेडीवाला यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीपूर्वी गणेडीवाला या ठाणे जिल्ह्यातील उत्तान -भायंदर येथील महाराष्ट्र न्यायिक अकादमी आणि भारतीय मध्यस्थी केंद्राच्या सहसंचालक होत्या. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगदी तीन महिन्यांपूर्वी १७ मे १९४७ रोजी नागपूर जिल्हा न्यायालयाचे प्रधान जिल्हा न्यायाधीश म्हणून एस. सी. राय यांची नेमणूक झाली होती. स्वातंत्र्याची तब्बल ६९ वर्षे उलटून ४८ प्रधान न्यायाधीश झाले. परंतु एकही महिला प्रधान जिल्हा न्यायाधीश म्हणून नेमण्यात आलेली नव्हती. वकिली व्यवसायात महिला झपाट्याने पुढे येत असताना प्रधान जिल्हा न्यायाधीश म्हणून आता पर्यंत एकाही महिलेची नियुक्ती करण्यात न आल्याचे वृत्त लोकमतने २९ मार्च रोजी ठळकपणे प्रसिद्ध केले होते. वृत्तात पुष्पा गणेडीवाला यांच्यासह अन्य संभाव्य महिला न्यायाधीशांच्या नावांचा उल्लेख होता.
पुष्पा गणेडीवाला प्रधान न्यायाधीश
By admin | Published: April 02, 2016 3:17 AM