लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतूक विभागाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शहरातील २० हजार ऑटोरिक्षा व कॅब्समध्ये क्यूआर कोड स्टिकर्स लावण्याच्या अभियानास सुरुवात केली आहे.परमिटधारक ऑटोचालक व कॅब चालकांच्या गाड्यांमध्येच हे स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. कोणताही प्रवासी स्टिकर लागलेल्या ऑटोमध्ये सवार होताच क्यूआर कोडला मोबाईलने स्कॅन करू शकणार आहे. स्कॅन करताच प्रवाशाला ऑटोचालकाचे नाव, गाडीचे क्रमांक व फोटोसह अन्य आवश्यक माहिती उपलब्ध होईल. ही माहिती प्रवासी आपल्या सुरक्षेकरिता आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना व्हॉट्सअॅपवर पाठवू शकेल. यामुळे कुटुंबीयांना संबंधित प्रवासी कोणत्या ऑटोमध्ये बसून प्रवास करत आहे, याची माहिती मिळेल. ही व्यवस्था विशेषत्वाने तरुणी व महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कार्यान्वित होत आहे. या कोडच्या माध्यमातून संबंधित ऑटो किंवा कॅबला पोलिसांद्वारे ट्रॅक केल्या जाऊ शकणार आहे. अशा स्थितीत प्रवासीही क्यूआर कोड स्टिकर्स असलेल्या ऑटोलाच प्राधान्य देतील. या व्यवस्थेचा लाभ परमिटधारी ऑटोचालकांनाही होणार आहे. सोमवारी सर्व दहा परिमंडळातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाहतूक विभागाचे आयुक्त (शहर) विक्रम साळी यांच्या हस्ते क्यूआर कोड स्टिकर्स लावण्याच्या मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाचीडीसीपी विक्रम साळी यांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही मोहीम महत्त्वाची असल्याचे सांगितले. विशेषत्वाने प्रवासी महिला काही ऑटोचालकांच्या अशिष्ट वर्तनाला बळी पडतात. त्यांच्याच सुरक्षेच्या अनुषंगाने या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. ऑटोचालक जवळच्या ट्राफिक ऑफिसला पोहोचून स्टिकर लावू शकणार आहेत.
नागपुरात २० हजार ऑटोरिक्षांवर लागतील ‘क्यूआर कोड स्टिकर्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 11:05 PM
वाहतूक विभागाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शहरातील २० हजार ऑटोरिक्षा व कॅब्समध्ये क्यूआर कोड स्टिकर्स लावण्याच्या अभियानास सुरुवात केली आहे.
ठळक मुद्देनागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक विभागाचा पुढाकारकोड स्कॅन करून नातेवाईकांना पाठवता येईल माहिती