शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

‘हे राम नथुराम’च्या प्रयोगात राडा

By admin | Published: January 23, 2017 1:42 AM

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेवर आधारित ‘हे राम नथुराम’ या नाटकामुळे

काँग्रेस, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेडचा विरोध आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेवर आधारित ‘हे राम नथुराम’ या नाटकामुळे रविवारी रात्री नागपुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व संभाजी ब्रिगेडने या नाटकाचा जोरदार विरोध करत डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहासमोर आंदोलन केले. नथुरामचे उदात्तीकरण करून महात्मा गांधी यांचा अपमान करण्याचा हा प्रयत्न असून नाटक बंद करावे, अशी मागणी या पक्षांतर्फे करण्यात आली तर दुसरीकडे शिवसेनेतर्फे नाटकाच्या संरक्षकाची भूमिका घेण्यात आल्याचे चित्र दिसून आले. ‘हे राम नथुराम’ या नाटकाला औरंगाबादेत शनिवारी विरोध करण्यात आला होता. रविवारी रात्री ९ वाजता या नाटकाचा प्रयोग देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या नाटकाचा प्रयोग होऊ देणार नाही, अशी भुमिका कॉंग्रेस, राष्ट्रवादीने अगोदरच जाहीर केली होती. त्यामुळे सभागृहाच्या परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री ८ वाजल्यापासूनच कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते धडकले. त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काही वेळातच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्तेदेखील पोहोचले व त्यांनीदेखील विरोध सुरू केला. सभागृहाच्या दुसऱ्या दारावर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष्य सलिल देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेदेखील पोहोचले. त्यांनी प्रवेशद्वारावर चढून आत येण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखून धरले. सुमारे दीड तास तिन्ही पक्षांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अखेर पोलिसांनी पदाधिकाऱ्यांसह तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाटकाला संरक्षण पुरविले होते. कॉंग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सभागृह परिसरात वादावादीदेखील झाली. हा निवडणुकांसाठीचा स्टंट : शरद पोंक्षे दरम्यान, या नाटकाचे दिग्दर्शक व अभिनेते शरद पोंक्षे यांनी विरोध करणाऱ्यांवर टीका केली. याअगोदर नागपुरात ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’चे प्रयोग झाले. त्यावेळी कुणी विरोध केला नाही. आता निवडणुका तोंडावर असल्याने हा ‘स्टंट’ सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. या नाटकाला ‘सेन्सॉर’चे प्रमाणपत्र मिळाले असून यातून कुणाचेही उदात्तीकरण करण्यात येत नाही. देशाच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांचा, ओवैसी बंधूंचा, भ्रष्टाचाऱ्यांचा असा विरोध हे करत नाहीत. समाजातील इतर समस्या संपल्या म्हणून नाटकाचा विरोध सुरू आहे की काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही कलाकृती नव्हे विकृती : विकास ठाकरे हे नाटक एका विशिष्ट हेतूने लिहीण्यात आले आहे. यातून गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याची एकतर्फी बाजू मांडून समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यता आला आहे. ज्यांनी हे नाटक लिहीले आहे व जे अभिनय करतात ते नथुरामभक्त आहेत. जाणुनबुजून या नाटकाच्या माध्यमातून राष्ट्रपिता गांधींचा अपमान करण्यात येत आहे. अशा प्रकाराला कॉंग्रेस विरोध करतच राहणार. कुठल्याही कलाकृतीला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र कलाकृतीच्या नावाखाली हे लोक समाजात विकृती पसरविण्याचे काम करत आहेत, या शब्दांत विकास ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. पदाधिकारी, कार्यकर्ते ताब्यात विरोध वाढल्यानंतर पोलिसांनी रात्री साडेनऊच्या सुमारास आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. आंदोलनकर्त्यांमध्ये कॉंग्रेसकडून माजी मंत्री, अनिस अहमद, प्रदेश कॉंग्रेस सचिव अतुल कोटेचा हेदेखील सहभागी होते. यावेळी कॉंग्रेसतर्फे विकास ठाकरे यांच्यासह विशाल मुत्तेमवार, अतुल लोंढे, अभिजीत वंजारी, अजय नासरे, उमाकांत अग्निहोत्री, प्रमोद ठाकूर, प्रशांत कापसे, इर्र्शाद अली, रोहीत यादव इत्यादी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी विनापरवानगी आंदोनल केल्याबाबत ताब्यात घेतले. राष्ट्रवादीकडून सलील देशमुख यांच्यासह विशाल खांडेकर, शैलेंद्र तिवारी, मुन्ना तिवारी, रोशन भिमटे, राकेश बोरीकर, अनिल खळगी, प्रणय जांभूळकर इत्यादींनी पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चढाओढ मनपा निवडणुकांत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. या पार्श्वभूमीवर या मुद्यावर वेगवेगळे स्थान पकडून विरोध केला. मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘कुणाचा जोर मोठा’ अशी चढाओढ दिसून आली. दुसरीकडे कॉंग्रेसमध्येदेखील दोन विचारप्रवाह दिसून आले. शहराध्यक्षांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी ‘नाटक होऊ देणार नाही’ असा आक्रमक पवित्रा घेतला होता. तर त्याचवेळी गांधीवादी परिवाराच्या माध्यमातून तेथे पत्रक वाटण्यात आले. यात ‘गोंधळ घालणे हा आमचा प्रांत नाही. आमचा विरोध वैचारिक असणे आम्हास बंधनकारक आहे’, अशी भूमिका नमूद होती. या पत्रकावर कॉंग्रेसच्या काही नेत्यांची नावे होती हे विशेष.(प्रतिनिधी)