शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 9:09 PM

महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत वाद घालून पोलीस ठाण्यातील गोंधळाचे मोबाईलमध्ये शुटिंग करणे डॉक्टर आणि त्यांच्या दोन भावाला चांगलेच महागात पडले. पोलिसांनी या तिघांनाही शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास मानकापूर पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला.

ठळक मुद्देमहिला पोलीस उपनिरीक्षकासोबत वादडॉ. द्विवेदीसह तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत वाद घालून पोलीस ठाण्यातील गोंधळाचे मोबाईलमध्ये शुटिंग करणे डॉक्टर आणि त्यांच्या दोन भावाला चांगलेच महागात पडले. पोलिसांनी या तिघांनाही शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास मानकापूर पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला.सूर्यकांत यज्ञनारायण द्विवेदी (वय ३०) हे गोधनी मार्गावरील डोळे ले-आऊटमध्ये राहतात. मानकापूर पोलिसांच्या माहितीनुसार ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. घरगुती वादामुळे त्यांची पत्नी रविवारी दुपारी मानकापूर पोलीस ठाण्यात आली. पत्नीच्या मागेच सूर्यकांत तसेच दीपक (वय २६) आणि ओम यज्ञनारायण द्विवेदी (वय २४) हे दोन भाऊ देखील पोलीस ठाण्यात आले. तेथे त्यांचा आपसात वाद सुरू झाला. ते मोठमोठ्याने बोलत असल्याने दिवसपाळी अधिकारी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक योगिता राम श्रीखंडे यांनी त्यांना ओरडू नका, असे म्हणत रागावले. श्रीखंडेपाठोपाठ ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनीही ठाण्यात वाद घालू नका, असे म्हणत त्यांना बाहेर जाण्याचा सल्ला दिला. त्याने अपमानित झाल्याची भावना झाल्यामुळे द्विवेदी बंधूंची श्रीखंडे तसेच ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची झाली. पोलीस विनाकारण अपमान करीत असल्याचे पाहून दीपक यांनी आपला मोबाईल काढून घटनाक्रमाचे शुटिंग सुरू केले. ते पाहून उपनिरीक्षक श्रीखंडे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी बळाचा वापर करून द्विवेदी बंधूंना आवरले. त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे