राहुल गांधी प्रकरण: मोदी सरकार विरोधात युवक कॉंग्रेसची नागपुरात निदर्शने

By गणेश हुड | Published: March 25, 2023 08:38 PM2023-03-25T20:38:27+5:302023-03-25T20:39:52+5:30

शनिवारी दक्षिण नागपुरातील छत्रपती चौकात  मोदी सरकार विरोधात निदर्शने

Rahul Gandhi case Youth Congress protests in Nagpur against Modi government | राहुल गांधी प्रकरण: मोदी सरकार विरोधात युवक कॉंग्रेसची नागपुरात निदर्शने

राहुल गांधी प्रकरण: मोदी सरकार विरोधात युवक कॉंग्रेसची नागपुरात निदर्शने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोदी सरकारने हुकुमशाही पद्धतीने सुरत कोर्टामार्फत दोन वर्षाची सजा सुनावली. एवढेच नव्हे तर त्यांची खासदारकीही रद्द केली, असा आरोप  करीत शहर युवक काँग्रेसतर्फे शनिवारी दक्षिण नागपुरातील छत्रपती चौकात  मोदी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.

राहुल गांधी केंद्र सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत होते. देशातील अनेक संस्था पंतप्रधान मोदींनी अदानीला विकल्या. असे असूनही  सरकारच्या विरोधात कोणी बोलू नये, यासाठी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याचा आरोप  माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी यावेळी केला.

आंदोलनात प्रफुल्ल गुडधे यांच्यासह माजी नगरसेवक मनोज गावंडे, दक्षिण पश्चिम युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य बोडे, मंगेश कमाने, प्रदेश कॉंग्रेसचे सचिव अभिषेक धवड, रोहित खैरवार, विशाल वाघमारे युवक कॉंग्रेसचे राज संतापे, किरण करपते, संजय जावळे, मयूर मोहोड, पवन सदैले, सर्वेश नायक, निलेश देशभ्रतार, गौतम गाणार, मुकेश शर्मा, आदेश मोहोड, प्रणित मोहोड, मंगेश गुडघे, प्रकाश चवरे, रवी खडसे, स्वप्नील गाठीबांधे, सुमंत कुरहेकर, लक्ष्मीकांत तुमसरे, दिलीप कापसे, किशोर घरे, दामोधर चिरकुटे, रशीद भाई, एड. गिरीश गादिलवार, अशोक जगनाडे, चंद्रप्रकाश शहाणे, लिनाताई कटारे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Rahul Gandhi case Youth Congress protests in Nagpur against Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.