राहुल गांधी यांनी घेतली मित्रजित खोब्रागडे यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 03:36 PM2018-06-13T15:36:03+5:302018-06-13T15:36:13+5:30
जिल्ह्यातील नांदेड येथे आगमन झाल्यानंतर भा. रा. काँ. चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्ह्यातील नांदेड येथे आगमन झाल्यानंतर भा. रा. काँ. चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. यावेळी दादाजी खोब्रागडे यांचे चिरंजीव मित्रजित खोब्रागडे यांच्यासोबत राहुल गांधी यांनी संवाद साधला. त्यांची ख्यालीखुशाली विचारली. त्यांच्या अडचणी व गरजा समजावून घेतल्या. यावेळी राहुल गांधी यांनी विदर्भातील सिंचन व्यवस्थेत अधिक सुधार होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मित्रजित यांनी, दादाजी खोब्रागडे यांच्या नावे संशोधन करण्यासाठी भूखंड देण्यात यावा, दादाजींना भारतरत्नने सन्मानित केले जावे अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी, दादाजींनी एच एम टी धानाचे वाण शोधून काढले मात्र त्याचा फायदा त्यांना झाला नाही. असे लाखो शेतकरी देशात आहे. मात्र इतरांना त्याचा फायदा होत आहे. सरकार केवळ १५- २० लोकांचेच भले करत आहे असे मत व्यक्त केले.
दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबातील सदस्यांना काँग्रेसतर्फे अडीच लाख वडेट्टीवार यांच्या वतीने देण्यात आले दिले. उद्या पाच लाखांची अधिक मदत दिली जाणार आहे. नरेश पुगलिया यांच्याकडून १ लाख मदत देण्यात आली. त्यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश व अ.भा. काँ. कमिटीचे महासचिव अशोक गहलोत होते.