राहुल गांधी यांना संघाचे अधिकृत निमंत्रण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 08:57 PM2018-08-27T20:57:27+5:302018-08-27T21:01:41+5:30

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे एका कार्यक्रमासाठी बोलविण्यात आल्याच्या चर्चांना सोमवारी ऊत आला होता. मात्र प्रत्यक्षात राहुल गांधी यांना संघाचे अधिकृत निमंत्रण देण्यात आले नसल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. संघाचे दरवाजे सर्व देशभक्त नागरिकांसाठी खुले आहेत. कुणालाही संघात येण्यापासून थांबविले जाणार नाही, असे संघ पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Rahul Gandhi has not the official invitation of RSS | राहुल गांधी यांना संघाचे अधिकृत निमंत्रण नाही

राहुल गांधी यांना संघाचे अधिकृत निमंत्रण नाही

Next
ठळक मुद्देसंघ पदाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती : आमचे द्वार सर्वांसाठी खुले

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे एका कार्यक्रमासाठी बोलविण्यात आल्याच्या चर्चांना सोमवारी ऊत आला होता. मात्र प्रत्यक्षात राहुल गांधी यांना संघाचे अधिकृत निमंत्रण देण्यात आले नसल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. संघाचे दरवाजे सर्व देशभक्त नागरिकांसाठी खुले आहेत. कुणालाही संघात येण्यापासून थांबविले जाणार नाही, असे संघ पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात १७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे देशातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी ‘भविष्यातील भारत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टीकोन’ या विषयावर संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला संघातर्फे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनादेखील निमंत्रित करण्यात आले आहे, असे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी सांगितले होते. मात्र या निमंत्रितांमध्ये राहुल गांधी हेदेखील आहेत, अशा चर्चांना देशभरात उधाण आले.
याबाबतीत संघ मुख्यालयातील पदाधिकाºयांना विचारणा केली असता त्यांनी असे काहीच नसून ही एक अफवा असल्याचे स्पष्ट केले. आम्ही कुणाला निमंत्रित करायचे हा आमचा निर्णय आहे. तसेदेखील संघाचे दरवाजे कुणासाठीही बंद नाहीत. ज्याला संघ जाणून घ्यायचा आहे, त्याचे स्वागतच आहे. मात्र राहुल गांधी यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे ही केवळ एक कल्पनाच आहे, असे त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर स्पष्ट केले.

...तर राहुल गांधी यांचे स्वागत
राहुल गांधी हे मागील काही दिवसांपासून आमच्यावर सातत्याने टीका करत आहेत. मात्र ही टीका वास्तवाला धरुन नाही. मुस्लिम ब्रदरहूडसोबत संघाची तुलना करणे यातूनच त्यांना संघाबाबत माहिती नसल्याचे दर्शवित आहे. आम्ही त्यांना विशेष निमंत्रण देणार नाही. मात्र त्यांना जर संघ जाणून घ्यायचा असेल तर त्यांचे स्वागतच करु, अशी संघ पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडली.

Web Title: Rahul Gandhi has not the official invitation of RSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.