लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या विभागातील १७ ठिकाणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी चार दुचाकी वाहनासह २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातच १६ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातंर्गत कार्यवाही देखील करण्यात आली आहे.विधानसभा निवडणूक २०१९ आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तसेच २ ते ८ ऑक्टोबर २०१९ महात्मा गांधी सप्ताहाच्या (कोरडा दिवस) निमित्ताने दारूबंदी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, अंमलबजावणी व दक्षता संचालक उषा वर्मा, विभागीय उपायुक्त मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक सुहास दळवी व त्यांच्या चमूने ही कारवाई केली.विदर्भातील कोणत्याही ठिकाणी अवैध मद्य निर्मिती, साठा अथवा विक्री आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश निरीक्षक सुहास दळवी यांनी दिले आहे.
नागपुरात अवैध दारू निर्मिती करणाऱ्या १७ ठिकाणावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:37 AM