लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (सावनेर/खापा) : स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईमध्ये जुगार खेळणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोटरसायकली, मोबाईल्स इतर साहित्य असा एकूण ९ लाख ९० हजार ५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावनगाव शिवारात बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.बावनगाव (ता. सावनेर) शिवारातील महेश बुरडे, रा. खापा, ता. सावनेर याच्या फार्महाऊसमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे सदर पथकाने त्या फार्महाऊसची पाहणी केली. तिथे जुगार खेळला जात असल्याचे स्पष्ट होताच, लगेच धाड टाकून जुगार खेळणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेत अटक केली.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कळू शकली नाही. या कारवाईमध्ये आरोपींकडून १ लाख ९३ हजार ४०५ रुपये रोख, १ लाख ४६ हजार रुपये किमतीचे २० मोबाईल हॅण्डसेट, ६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या ११ मोटरसायकली व ६५० रुपयांचे जुगार खेळण्याचे व इतर साहित्य, असा एकूण ९ लाख ९० हजार ५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जपत केला.याप्रकरणी खापा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार, उपनिरीक्षक सचिन मत्ते, सहायक फौजदार बाबा केचे, हवालदार चंद्रशेखर गडेकर, गजेंद्र चौधरी, महेश जाधव, शिपाई सुरेश गाते, रोहन डाखोरे, विपीन गायधने, महेश बिसने व अमोल कुथे यांच्या पथकाने केली.
धाड : २३ जुगाऱ्यांना अटक,९.९० लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 12:21 AM
: स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईमध्ये जुगार खेळणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावनगाव शिवारात बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील खाप्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई