लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनीषनगरातील सप्तश्रृंगी अपार्टमेंटमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी छापा घालून तीन बुकींना पकडले. त्यांच्याकडून रोख, टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईलसह दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.रविवारी आयपीएलमधील किंग्स एलेव्हन पंजाब व दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये होणाऱ्या टी-२० सामन्यावर मनीषनगरातील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर खायवाडी केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ ला मिळाली. त्यावरून ४ च्या पथकाने मनीषनगरातील उपरोक्त अपार्टमेंटमध्ये रविवारी रात्री छापा घालून जफर पठाण शफी पठाण (वय ४०, रा. गणेश अपार्टमेंट महाल), श्रीराम पूनमदास बारापात्रे (वय ४३, रा. पाचपावली) आणि नीलेश भगवानदास कारिया (वय ३६, रा. पाचपावली) या तीन बुकींना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून रोख १९०० रुपये, लॅपटॉप, टीव्ही, मोबाईलसह एकूण १ लाख ५० हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेलतरोडी ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त डॉ. शालिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर, सहायक निरीक्षक प्रदीप अतुलकर, उपनिरीक्षक मनीष वाकोडे, राजपूत, हवालदार बट्टूलाल पांडे, मिलिंद मुन, नृसिंह दमाहे, सतीश मेश्राम, शिपाई प्रशांत कोडापे, सतीश निमजे,रवींद्र राऊत, अविनाश ठाकूर, गोविंद देशमुख, राजेंद्र तिवारी यांनी ही कामगिरी बजावली.सट्टाबाजार सक्रियआयपीएलच्या रणसंग्रामाला शनिवारी सुरुवात झाली. या हंगामात ६१ सामन्यांमध्ये विविध संघात रोमहर्षक लढती होणार आहेत. नागपूर हे बुकींचे माहेरघर असून, देश-विदेशातील बुकींसोबत स्थानिक बुकी संधान साधून हजारो कोटींचा सट्टाबाजार गरम करतात. यावेळीदेखील नागपुरातील सट्टाबाजार तेवढ्याच जोमाने सुरू झाला आहे.
नागपूरच्या मनीषनगरातील सट्टा अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 1:18 AM
मनीषनगरातील सप्तश्रृंगी अपार्टमेंटमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी छापा घालून तीन बुकींना पकडले. त्यांच्याकडून रोख, टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईलसह दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : तीन बुकींना पकडले