लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील आहुजानगरात राहणारा बुकी दिलीप खेमचंद प्रेमचंदानी (वय ३९) याच्याकडे छापा मारून पोलिसांनी टीव्ही, मोबाईलसह २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.प्रेमचंदानी अनेक दिवसांपासून क्रिकेट मॅचवर सट्ट्याची खायवाडी करतो. शनिवारी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारला असता तो राजस्थान रॉयल विरुद्ध मुंबई इंडियन्स संघादरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर मोबाईल अॅपच्या माध्यमातून खायवाडी करताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तेथून टीव्ही, पाच मोबाईल आणि अन्य साहित्य जप्त केले. त्याच्याविरुद्ध जरीपटका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार, सहायक आयुक्त कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे, द्वितीय पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे, उपनिरीक्षक अतुल डाके, हवालदार लखन कनोजिया, प्रदीप भैसे, हरिचंद भट, शिपाई प्रवीण मरापे, नारायण आणि महिला शिपाई कविता यांनी ही कामगिरी बजावली.विशेष म्हणजे, उपाराजधानीत सर्वाधिक क्रिकेट बुकी जरीपटक्यात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते बुक (बेटिंग) चालवितात. त्यातून रोज लाखोंची खायवाडी आणि लगवाडी करतात. पोलिसांनाही मोठी देण दिली जाते. ठाण्यातल्या ठाण्यात ही बाब माहीत असल्याने वरिष्ठांच्या कानापर्यंत तो प्रकारच जात नाही. वरिष्ठांनी लक्ष घातले तरच बुकीविरुद्ध कारवाई होते. जरीपटका पोलीस या प्रकारात अनेक वर्षांपासून वादग्रस्त भूमिका बजावत आहेत. या छाप्यात रजिस्टर जप्त करण्यात आले. त्यात अनेक सामन्यांच्या खायवाडी आणि लगवाडीच्या लाखोंच्या व्यवहाराची नोंद असल्याचे समजते. त्यावरून प्रेमचंदानी गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट सामन्याच्या बेटिंगमध्ये सक्रिय असल्याचे स्पष्ट होते.गणेशपेठमधील मटका अड्ड्यांवर छापेगणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटक्याच्या दोन अड्ड्यांवर पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाने छापा मारून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून रोख ३६ हजार तसेच मोबाईल जप्त करण्यात आले.गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंजीपेठ आणि धम्मनगरात आरोपी संदीप वंजारी मटक्याचे अड्डे चालवितो. गणेशपेठ ठाण्यात महिन्याला तगडी देण देत असल्यामुळे त्याच्या मटका अड्ड्यावर पोलीस जात नाहीत. ही माहिती परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर यांना मिळाली. त्यांनी आपल्या विशेष पथकाच्या माध्यमातून १८ एप्रिलला गंजीपेठ व धम्मनगरातील मटका अड्ड्यावर छापा मारून रितेश गौतम सोमकुंवर (वय २४, रा. धम्मनगर), निखील घनश्याम बांगडे (वय २४, रा. भारतनगर, कळमना), अशोक नारायण घोडमारे (वय ४३, रा. गंजीपेठ गांधी चौक) आणि मिलिंद बाळाजी बोरीकर (वय ४५, रा. हंसापुरी, तहसील) या चौघांना अटक केली. त्याच्या ताब्यातून ३९,१९० रुपये तसेच मोबाईल असा एकूण ४२,१९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद्र मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ तीनच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक शिवराज जमदडे, पंकज वाघोडे, एएसआय मधुकर, नायक संदीप, संतोष शिपाई, पंकज वाघोडे, कोतवालीचे सहायक निरीक्षक निस्वादे आणि शिपाई सारंग यांनी ही कामगिरी बजावली.
नागपूरच्या जरीपटक्यातील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:58 AM
जरीपटक्यातील आहुजानगरात राहणारा बुकी दिलीप खेमचंद प्रेमचंदानी (वय ३९) याच्याकडे छापा मारून पोलिसांनी टीव्ही, मोबाईलसह २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ठळक मुद्देबुकी प्रेमचंदानीला अटक : पाच मोबाईलसह बेटिंगचे साहित्य जप्त