लाेकमत न्यूज नेटवर्क
पाटणसावंंगी : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशान्वये नागपूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये काही निर्बंध घालण्यात आले आहे. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या दाेन हाॅटेलवर सावनेर पाेलिसांनी धाडी टाकल्या असून, हाॅटेलमालक व कर्मचारी अशा एकूण सात जणांवकरुद्ध गुन्हे नाेंदविण्यात आले आहेत. ही कारवाई पाटणसावंगी (ता. सावनेर) परिसरात नुकतीच करण्यात आली.
आराेपींमध्ये हाॅटेलमालक सिद्धार्थ सुनील अग्रवाल (३६, रा. सदर, नागपूर), कर्मचारी रोहित चंद्रकांत सवाइतूल (३१, रा. शिवाजीनगर कोराडी, ता. कामठी), अमित रामदास मडावी (२४, रा. चिमूर जिल्हा चंद्रपूर), अजय मंगलसिंग राठोड (२९, रा. तुरणवळणी जिल्हा यवतमाळ), करण लखनसिंग ठाकूर (२९, रा. सिडियापलारी जिल्हा शिवणी, मध्य प्रदेश), राकेश वासुदेव बावणे (२५, रा, चिमूर, जिल्हा चंद्रपूर) व अंकित संजय पातोडकर (२२, रा. वलनी खाण, ता. सावनेर) या सात जणांचा समावेश आहे.
काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू केला आहे. या कायद्यान्वये हाॅटेल सुरू ठेवण्याच्या वेळा व आतील आसनी व्यवस्थेवर काही बंधने घातली आहेत. दरम्यान, पाटणसावंगी-कवडस (ता. सावनेर) परिसरातील ड्राइव्ह ॲण्ड डाइन व एमएच-४७ मध्ये काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे उल्लंघन केले जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांच्या पथकाने या दाेन्ही हाॅटेल्सची प्रत्यक्ष पाहणी केली.
तिथे प्रतिबंधक उपाययाेजनांचे उल्लंघन हाेत असल्याचे लक्षात येताच धाड टाकली आणि मालकांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हे नाेंदविले. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि १८८, २६९, २७० तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ सहकलम ३७(१), (३), ३३ एम/१३१ अन्वये गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक मारुती मुळूक, सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, संदीप नागरे, खोमेश्वर बांबल, हेमराज कोल्हे, हिंमत राठोड, भूपेंद्र तभाने यांच्या पथकाने केली.
...
चार टेबलवर १७ ग्राहक
धाड टाकली त्यावेळी या दाेन्ही हाॅटेलमधील चार टेबलसमाेर एकूण १७ ते १८ जण जेवण करायला बसले हाेते. सर्व ग्राहक बाहेर गावांमधील हाेते. हाॅटेल मालकांनी फिजिकल डिस्टन्सिंगच्या अनुषंगाने ग्राहकांच्या बसण्याची तसेच त्यांच्या सॅनिटायझेशनची याेग्य साेय केली नव्हती. शिवाय, ही दाेन्ही हाॅटेल रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. हॉटेलमध्ये काय चालले आहे हे दिसू नये, साठी दर्शनी भागावर माेठा काळा पडदा लावला होता. ग्राहकांनी त्यांची वाहने दूरवर उभी ठेवण्याची व्यवस्था केली हाेती. त्यामुळे हे दाेन्ही हाॅटेल वरवर पाहता बंद असल्याचे दिसून येत हाेते, अशी माहिती सहायक पाेलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी दिली.
===Photopath===
030621\img-20210602-wa0020.jpg
===Caption===
हॉटेल ड्राइव्ह अँड डाईन