लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार (दि.९) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (जाेशी) येथील जुगारावर धाड टाकली. यात जुगार खेळणाऱ्या १५ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून राेख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ५ लाख ५९ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांमध्ये आकाश जगदीश केवटे (२५), रोशन गुणवंता चिचाटे (३०), धीरज भाेजराज केवटे (२७), सुनील हिरामन खेरडे (४०), दिनेश निळकंठ चौरे (४१), अरुण गोपाळा धुआधप्पा (४०), रमेश पुरुषाेत्तम ठाकरे (३२), श्रीपाद महादेव शोधले (३०), दादाराव सुभाष हरकरे (३५) सर्व, रा. कोथुळना, ता. सावनेर, सुनील देवराव वाघुके ( ३०, रा. किरणापूर, ता. सावनेर), मोहन साेनबा सहारे (४३ ), सुधाकर सखाराम सनेश्वर (४४) दाेघेही रा. सालई (मोकासा), ता. पारशिवनी, पिसाराम सखाराम सनेश्वर (३६, रा. पारशिवनी), अविनाश आनंदराव बेले (४०), विजय निस्ताने (४०) दाेघेही रा. निमतलाई, ता. सावनेर व रवी मनाेहर गोतमारे ( ४२, रा. पारशिवनी) यांचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पारशिवनी परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना दहेगाव (जाेशी) लगतच्या कुसुमधारा शिवारातील रवी गाेतमारे यांच्या शेतात असलेल्या घराच्या अंगणात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे या पथकाने लगेच पाहणी केली. तिथे जुगार सुरू असल्याचे लक्षात येताच त्यांनी धाड टाकली व जुगार खेळणाऱ्या सर्वांना शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ५४ हजार ७४० रुपये राेख, ३ लाख २० हजार रुपये किमतीच्या सहा माेटरसायकली, ८४ हजार रुपये किमतीचे ११ माेबाईल फाेन, व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण ५ लाख ५९ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.
याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, सहायक फाैजदार बाबा केचे, हवालदार चंद्रशेखर गडेकर, मदन आसतकर, राजेंद्र रेवतकर, आशिष मुंगळे, किशाेर वानखेडे, उमेश फुलबेल, राेहन डाखाेळे, विपीन गायधने, अमाेल वाघ, अमाेल कुथे यांच्या पथकाने केली.