लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी परिसरात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर यशोधरानगर पोलिसांनी छापा घातला आणि १९ जुगाऱ्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून रोख आणि मोबाईलसह ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपी विक्रम डेकाटे यांच्याकडे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती यशोधरानगर पोलीस पथकाला शुक्रवारी दुपारी मिळाली. त्यावरून पोलिसांनी विक्रम डेकाटे याच्या घरी छापा घातला. यावेळी तेथे अमर बालाधरे, रणजित धकाते, विक्रम डेकाटे, मंगेश नंदनवार, विश्वजित भोवते, मंगेश लाटकर, किशोर हेडावू, सचिन बुराडे, रोशन धुळे आणि लक्की बोरकर हे ५२ ताश पत्त्यावर जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख १२ हजार, ६०० रुपये तसेच मोबाईल्स असा एकूण ७२ हजार, २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध जमाबंदी कायदा आणि जुगार बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल, सहायक आयुक्त परशुराम कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार दीपक साखरे, पोलीस निरीक्षक मोहिते, उपनिरीक्षक भार्गव, सहायक निरीक्षक चंद्रशेखर, विनोद सोलव, हवालदार सुधीर आत्राम, संजय बडे, अक्षय सरोदे आणि विकास चहांदे यांनी ही कामगिरी बजावली.
नागपुरातील बिनाकी मंगळवारीत जुगार अड्ड्यावर छापा : दहा जुगारी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 9:24 PM
मंगळवारी परिसरात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर यशोधरानगर पोलिसांनी छापा घातला आणि १९ जुगाऱ्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून रोख आणि मोबाईलसह ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ठळक मुद्देयशोधरानगर पोलिसांची कारवाई