लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलीस (जुनी) ठाण्याच्या हद्दीतील तारानगर खैरी येथे एका घरात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून पाेलिसांनी सहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून ४ लाख ६४ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (दि.२७) मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये माेहम्मद सादीक अन्सारी मियावलउद्दीन अन्सारी (३६), दिलशहा मलिक ऊर्फ साेनू इरसाद मलिक (२९, रा. परवेजनगर, नागपूर), बिहाल भगवानदास शाहू (२३, रा. त्रिशाला मातानगर, नागपूर), माेहम्मद जमील अन्सारी माे. ईसाक अन्सारी (४५, रा. टिमकी, नागपूर), रिजवान रहमान खान (४४, रा. याेगी अरविंदनगर, नागपूर) व माेहम्मद जमील बरकामउल्हा (४२, रा. टिमकी, नागपूर) यांचा समावेश आहे. तारानगर, खैरी येथील एका घरी जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती जुनी कामठी पाेलिसांना मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी आराेपी माेहम्मद सादिक अन्सारी याच्या घरी धाड टाकली असता, सर्व आराेपी ताशपत्त्यांवर पैशांचा जुगार खेळताना आढळून आले. आराेपीकडील राेख १९,५०० रुपये, चार माेटारसायकल, विविध कंपन्यांचे सहा माेबाईल हॅण्डसेट, एक दरी व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण ४ लाख ६४ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदवून आराेपींना अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलीस निरीक्षक युनूस शेख, तगराज पिल्ले, गयाप्रसाद वर्मा, अश्फाक अन्सारी, प्रीतम मेश्राम यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.