लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलिसांनी खैरी शिवारात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून १० जुगाऱ्यांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून राेख १६,५०० रुपयांसह माेबाईल हॅण्डसेट, तीन दुचाकी असा एकूण १ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.७) रात्री १० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांमध्ये माे. सरफराज अहसान उल्ला (३८), माे. आरिफ माेहम्मद जावेद (३८) दाेन्ही रा. अहमदनगर, नागपूर, लियाकत अहमद अश्फाक अहमद (३८, रा. टिमकी, नागपूर), माे. खालीद पीर माेहम्मद (३५), शब्दर खान खाउजा खान (५३), माे. हबीब माेहम्मद युसूफ (३१) तिन्ही रा. बाेरियापुरा, नागपूर, माे. आरिफ माेहम्मद नियाजतुल्ला हाजी (३२), अब्दुल हकीम अब्दुल हबीब (५०), तहीसर हुसेन मुकदर हुसेन (४३), शेख शेरू अजमत मिया (५२) सर्व रा. पांजरा, नागपूर, यांचा समावेश आहे.
खैरी शिवारातील गुप्ता हाऊसजवळील माेकळ्या जागेवर माेठ्या प्रमाणात पैशांचा जुगार खेळला जात असल्याची गुप्त सूचना कामठी (जुनी) पाेलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी खैरी शिवारात पाहणी केली. तिथे पैशांचा जुगार सुरू असल्याचे दिसून येताच पाेलिसांनी धाड टाकली व सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून राेख १६,५०० रुपयेे, तीन दुचाकी व माेबाईल हॅण्डसेट असा एकूण १ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी १२ मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदवून आराेपींना अटक केली आहे. ही कारवाई पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल, सहायक पाेलीस उपायुक्त राेशन पंडित, ठाणेदार राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनात हेड काॅन्स्टेबल संजय गीते, प्रशांत सलाम, पवन गजभिये, अंकुश गजभिये, मनीष बन यांच्या पथकाने केली.