लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : पाेलिसांच्या पथकाने वडधामणा शिवारात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. यात जुगार खेळणाऱ्या पाच जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून राेख रक्कम, माेबाइल, दुचाकी वाहने, असा एकूण ४ लाख ३१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. १७) करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये अभिषेक ऊर्फ सनी राजेश वऱ्हाडपांडे (२४, रा. कंट्रोल वाडी), प्रशांत मनोहर पाटील (३६, रा. डोबीनगर वडधामना), भावेशकुमार विश्वनाथ बघेल (२४, रा. वैभवनगर, वाडी), सचिन मोहन सोमकुवर (२५, रा. हिलटॉप कॉलनी, आठवा मैल) व आदित्य ऊर्फ डोमा शेषराव राऊत (२१, रा. स्मृती लेआऊट, दत्तवाडी) या पाच जणांचा समावेश असून, मोहन खर्जे, जितू यादव, आकाश गंधारे व दिनेश मालुरे हे जुगारी पळून गेल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
वडधामणा शिवारात जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच वाडी पाेलिसांच्या पथकाने त्या शिवाराची पाहणी केली. तेथील नाल्याच्या काठी जुगार खेळला जात असल्याचे दिसताच पाेलिसांनी धाड टाकली. यात पाच जुगाऱ्यांना पकडण्यात पाेलिसांना यश आले, तर चाैघे पळून गेले. अटकेतील जुगाऱ्यांकडून ४५ हजार रुपये राेख, आठ माेटारसायकली, चार माेबाइल हँडसेट व जुगार खेळण्याचे साहित्य, असा एकूण ४ लाख ३१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, गणेश मुंढे, सुनील नट, रवींद्र सातोकर, धर्मेंद्र यादव, प्रवीण फलके, फहीम खान यांच्या पथकाने केली.
===Photopath===
180521\img_20210518_163945.jpg
===Caption===
जुगार खेळणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात